घरमुंबईन्हावा-शेवा येथे रक्तचंदनाच्या लाकडांची तस्करी

न्हावा-शेवा येथे रक्तचंदनाच्या लाकडांची तस्करी

Subscribe

न्हावा-शेवा बंदरामार्गे मलेशियाला निघालेल्या कंटेनरमध्ये रक्तचंदन लाकडाची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तांदळाच्या पिशव्यांमधून रक्तचंदनाच्या लाकडांची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महसूल गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कमुळे रक्तचंदनाच्या लाकडांची तस्करी पकडण्यात महसूल गुप्तचर यंत्रणेला यश आले आहे. उरण न्हावा-शेवा या ठिकाणी रक्तचंदनाच्या लाकडांनी भरलेला कंटेनर आढळून आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तांदळाच्या पिशवीतून करण्यात आली तस्करी

उरण न्हावा – शेवा येथून बुधवारी रक्तचंदनाच्या लाकडांनी भरलेला कंटेनर न्हावा-शेवा बंदरामार्गे मलेशियाला निघाला होता. या कंटेनरमध्ये तांदळाच्या पिशव्या होत्या. या तांदळाच्या पिशव्यांमध्ये रक्तचंदनाची लाकडे होती. या तस्करीचा कोणालाही संशय येऊ नये याकरता तांदळाच्या पिशवीतून या लाकड्यांची तस्करी करण्यात आली होती. मात्र निर्यात कागदपत्रांमध्ये पॉलिएस्टर धाग्याची बंडल असल्याचे सांगण्यात आले. या कंटेनरची तपासणी केली असता यामध्ये रक्तचंदनाची लाकडे असल्याचे उघड झाले.

- Advertisement -

पॉलिएस्टर धाग्याऐवजी निघाले रक्तचंदन लाकूड

निर्यात कागदपत्रांमध्ये पॉलिएस्टर धाग्याची एकूण ६४८ बंडल असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कंटेनरची तपासणी केली असता पॉलिएस्टर धाग्याऐवजी प्रत्यक्षात ९ हजार ४० किलो वजनाची रक्तचंदन लाकडे सापडली. या चंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात चार कोटी ५२ लाख इतके मूल्य आहे.

रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर

रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींकरता केला जातो. या लाकडापासून फर्निचर आणि औषध बनवण्यााठी उपयोग केला जातो. चीन आणि जपानमध्ये रक्तचंदनाला मोठी मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -