घरमुंबईकनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी मुदतवाढ देण्यास नकार

कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी मुदतवाढ देण्यास नकार

Subscribe

मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापदाची भरती प्रक्रीया राबवण्यासाठी घेण्यात येणार्‍या ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांकडून मुदतवाढ देण्याची मागणी होत असतानाच नगर अभियंता विभागाने यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापदाची भरती प्रक्रीया राबवण्यासाठी घेण्यात येणार्‍या ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांकडून मुदतवाढ देण्याची मागणी होत असतानाच नगर अभियंता विभागाने यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कनिष्ठा अभियंता पदाची रिक्तपदे भरण्यासाठी पूर्व नियोजित दिनांकादिवशीच ऑनलाईन परीक्षा घेणे उचित ठरेल,असे नगरअभियंता अर्चना आचरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेत एकूण ३४१ कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्तपदांसाठी घेण्यात आलेली ऑनलाईन भरती परीक्षा आचारसंहितेच्या काळांमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आल्याने स्थायी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास किमान १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी राष्ट्वादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी उपसूचनेद्वार केली होती. त्याला भाजपचे प्रभाकर शिंदे आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी पाठिंबा देत ही मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

सदस्यांनी उपस्थित केलेल्या या मुद्दयासंदर्भात नगरअभियंता अर्चना आचरेकर, संचालक विनोद चिठोरे आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या उत्तरामध्ये मुदतवाढ देण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आदर्श निवडणूक आचारसंहितेनुसार आचार संहितेपूर्वी जाहिरात दिलेली असल्यास, आचार संहितेच्या कालावधीमध्ये अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेला आचार संहितेचा अडसर येत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यांच्या गैरहजेरीत माजी अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी पुन्हा प्रस्ताव राखून ठेवला आहे.

हेही वाचा –

रामदास आठवलेंनी संजय राऊतांसमोर ठेवला मुख्यमंत्रीपदाचा नवा फॉर्म्युला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -