घरमुंबईउघाणीपाडा नळ योजनेकडे दुर्लक्ष

उघाणीपाडा नळ योजनेकडे दुर्लक्ष

Subscribe

ग्रुप ग्रामपंचायत ओंदे अंतर्गत उघाणीपाडा गावा करता पेसा निधीतून लघु नळ योजना करण्यात आली मात्र एक दीड वर्षातच या नळ योजनेची पाईप लाईन व नळ स्टँडपोस्ट तुटल्याने पाणी भरण्यासाठी महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नळ योजनेची दुरूस्ती करण्यासाठी ओंदे ग्रामपंचायतीच्या गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत ठरावही करण्यात आला. महिलांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला तोंडी तक्रारी करूनही नळ योजनेचे तुटलेले नळ, फुटलेली पाईप लाईन, तुटलेले नळ स्टँडपोस्ट व चौथरा यांची कामे न केल्याने पाण्याची मोटार चालू केल्याने व लोकांना पा़णी भरण्यासाठी टाकीतून काँक चालू केल्याने पाईपना नळ व स्टँड नसल्याने पाणी ठराविक ठिकाणी जास्त जाते.

- Advertisement -

त्यामुळे इतर नळांना पाणी येत नाही. यामुळे काही ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहून पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागते. या सर्व तक्रारी देऊनही ओंदे ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे.

पाणी टंचाईपासून व पाणी भरण्याची महिलांनी पायपीट करू नये याकरिता ही नळ योजना केली मात्र या योजनेची दुरूस्ती न केल्याने महिलांना तुटलेल्या पा़ईपासमोर पाणी भरावे लागते.
—चंपा बरफ, स्थानिक महिला

- Advertisement -

ग्रामपंचायतीला तक्रारी व ग्रामसभेत नळ योजना दुरूस्तीचे ठराव घेऊनही दुरूस्तीचे काम सुरू केलेले नाही. तरी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर दुरूस्तीचे काम सुरू करून पाणी पुरवठा सुरळीत करावा.
—श्रावण कनोजा , ग्रामस्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -