घरमुंबईरेती माफियांविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई; चार आरोपी फरार

रेती माफियांविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई; चार आरोपी फरार

Subscribe

६६ लाख १५ हजार रुपये किंमतीचे सर्व यंत्रसामग्री गॅस कटरने तोडली.

रेती उत्खननासाठी राज्य शासनाची कोणतीही परवानगी नसताना कोनगांव खाडी पात्रात बेकायदेशीरपणे रेती माफिया सक्शन पंप व लोखंडी बार्जद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याची माहिती भिवंडी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर आणि तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी खाडी पात्रातील अवैध सक्शन पंपांवर कारवाईचे आदेश निवासी नायब तहसीलदार गोरख फडतरे, महेश चौधरी, मंडळ अधिकारी चंद्रकांत रजपूत आणि अंजूर सजेचे, तलाठी बुधाजी हिंदोळा आदी महसूल पथकाला दिले होते. त्यानुसार भिवंडी तहसील महसूल पथक आणि कोनगांव पोलिसांच्या सहाय्याने गुरुवारी दिवसभर कोनगांवच्या खाडीपात्रात धडक कारवाई केली.

रेती माफियांचा अजूनही शोध सुरू 

या कारवाईत ४ सक्शन पंप आणि २ लोखंडी बार्ज असा ६६ लाख १५ हजार रुपये किंमतीचे यंत्रसामुग्री जप्त केली. तसेच त्याच ठिकाणी गॅस कटरच्या सहाय्याने मोडीत काढण्यात आले आहेत. यावेळी जलयानावरील रेती माफियांना महसूल पथकाच्या कारवाईचा सुगावा लागताच चौघे रेती माफिया पाण्यात उड्या घेऊन पोहत तिवरांच्या झुडूपात पसार झाले. या अवैध रेती उत्खनन प्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात अज्ञात रेती माफियांच्या विरोधात भादंवि कलम ३७९, ४३९, ३४ सह महाराष्ट्र्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७), ४८ (८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार रेती माफियांचा कोनगांव पोलीस कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. महसूल विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भिवंडी : नवविवाहितेला भरधाव टेंपोने चिरडले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -