घरमनोरंजनDrugs Case : महिन्याभराने रिया घरी परतली; भायखळा कारागृहातून जामीनावर सुटका

Drugs Case : महिन्याभराने रिया घरी परतली; भायखळा कारागृहातून जामीनावर सुटका

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात असलेली रिया चक्रवर्ती अखेर आज तिच्या घरी परतली. रिया चक्रवर्तीची सुमारे महिनाभराने सुटका झाली आहे. महिनाभरानंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली आहे. यावेळी भायखळा तुरुंगाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिया चक्रवर्तीच्या सुटकेच्या वेळी प्रसारमाध्यमांचीही मोठी गर्दी पाहण्यास मिळाली. यापूर्वी रियाने तिनदा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो नामंजूर करण्यात आला होता. अखेर आज, बुधवारी रियाला जामीन मंजूर झाला. तर रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला मात्र जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

- Advertisement -

 

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबर रोजी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियाचा जामीन याचिका आज मुंबई हायकोर्टाने स्वीकारली आहे. यासाठी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच तिला तिचा पासपोर्ट एनसीबीकडे जमा करावा लागणार आहे. शिवाय तिला तपास यंत्रणेच्या परवानगी शिवाय मुंबई बाहेर जाता येणार नाही. मुंबई बाहेर जायचे असेल तर तिला तपास अधिकाऱ्याला कळवावे लागले. दरम्यान, रिया सुटका झाल्यानंतर दर १० दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी नोंदवावी लागणार आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने रियाचा जामीन मंजूर केला असला तरी रियाचा भाऊ शौविक याच्यासह अब्दुल बसितचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘अन्यथा ११ ऑक्टोबरच्या MPSC परीक्षा उधळून लावू’, मराठा संघटनांचा इशारा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -