घरमुंबईसंकटांवर धावाचा, मागं फिराचा नाय

संकटांवर धावाचा, मागं फिराचा नाय

Subscribe

वीरबाला हालीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आलंल्या संकाटावर धावाचा, माघं फिराचा नाय, तवाच यश मिळाचं, असे मार्गदर्शन राष्ट्रीय वीरबाला शौर्य पुरस्कार विजेती हाली बरफ हिने एकलव्य परिवर्तन विद्यालयातील विद्यार्थ्यांना केले.

शहापूरच्या-तानसा धरण परिसरातील आटगांव-नांदगांवला जमनाच्या पाड्यात राहणारी राष्ट्रीय वीरबाला पुरस्कार विजेती हाली बरफ हलाखीचे जीवन जगत आहे.2013 साली रानात सरपण गोळा करताना झालेल्या बिबट्याशी एकाकी सामन्यात हालीने आपल्या बहिणीचा जीव वाचवला होता.या शौर्यामुळे तीचा तत्कालीन राष्ट्रपती मनमोहन सिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. मात्र हालीच्या आजच्या हलाकीच्या परिस्थितीबद्दल दै. ‘आपलं महानगर’ने ४ ऑक्टोबरच्या अंकातून वाचा फोडली.

- Advertisement -

त्यानंतर श्रमजीवी संघटनेने हालीला मदत करण्याचा विडा उचलला. तिच्या शौर्याची माहिती घेवून त्यातून प्रेरणा घेण्यासाठी श्रमजीवीने येथील एकलव्य परिवर्तन विद्यालयात हालीचे सोमवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मी कशी घडले या विषयावर हालीनेही आपल्या बोली भाषेत संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही तिने नीडरपणे उत्तरे दिली. एकलव्य विद्यालयाचे संस्थापक विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांनी तिला शाबासकी दिली.

विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. वृत्तपत्रात दिसलेली हाली प्रत्यक्षात कशी आहे. ती कशी दिसते,कशी बोलते हे पाहण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. नांदगांवचे सरपंच लक्ष्मण चौधरी, मुख्याद्यापक उमेश पष्टे, भुपेंद्र कर्वे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपल्या पत्नीचे तोंडभरून कौतुक केले जात असल्याचे पाहून हालीचे पती राम कुवरेही भारावून गेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -