घरमुंबईऑक्सिजन यंत्र कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त ३० कोटी

ऑक्सिजन यंत्र कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त ३० कोटी

Subscribe

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार

महानगरपालिकेच्या विविध रुग्णालये आणि विविध आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन निर्मिती यंत्रांचे कार्यान्वितीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात बाजारमूल्यापेक्षा अधिक रकमेची तरतूद केल्याने मुंबई महानगरपालिकेचे 30 कोटींहून अतिरिक्त रुपये खर्च होत असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पालिकेकडून अद्यापही निविदेत बाजी मारणार्‍या कंत्राटदारांस कार्यादेश जारी करण्यात आले नाही, अशी माहिती या माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाली आहे.माहितीच्या अधिकारात विचारलेल्या विविध माहितीत कार्यकारी अभियंता शाम भारती यांनी अनिल गलगली यांस कळविले की, या प्रकरणात आजमितीस कोणतेही कार्यादेश देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -