घरमुंबईभाजप रोडरोमिओसारखं मागे लागलंय - शिवसेना

भाजप रोडरोमिओसारखं मागे लागलंय – शिवसेना

Subscribe

सतत नाही म्हणत असताना देखील आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा असं म्हणत आमच्या मागे रोडरोमिओसारखं फिरणं गुन्हा आहे. आम्हाला तुमच्यात अजिबात रस नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

सतत नाही म्हणत असताना देखील आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा असं म्हणत आमच्या मागे रोडरोमिओसारखं फिरणं गुन्हा आहे. आम्हाला तुमच्यात अजिबात रस नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे अशा शब्दात अमित शहा यांनी मित्रपक्षांना लातूरमध्ये इशारा दिला होता. त्यावर आता शिवसेनेनं देखील अमित शहा यांना इशारा दिला आहे. मित्रपक्षांना पटकण्याची भाषा कुणीही करू नये. आम्ही मातीतले पैलवान आहोत. पुतळ्यांची नव्हे आम्ही विचारांची उंची वाढवतो. आम्हीही तलवारीला धार काढून बसलोय अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. २०१४ साली भाजपनं युती तोडली आम्ही नाही. आता भाजपला का झोंबतय? असा सवाल देखील यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना – भाजप युती होणार का? कुणाला किती जागा मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, भाजप सर्व जागा लढेल आणि किमान ४० जागा तरी महाराष्ट्रामध्ये सहज जिंकेल अशा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला होता. लातूरमधील या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हजर होते. त्यानंतर आता शिवसेनेनं भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं शिवसेनेनं भाजपला पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. या साऱ्या घडामोडी घडत असताना आता शिवसेना – भाजप युती होणार का? हे पाहावं लागणार आहे. त्यासाठी आणखी काही काळ तरी नक्कीच वाट पाहावी लागेल.

वाचा – शिवसेनेसमोर झुकणार नाही – अमित शहा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -