घरमुंबईदादर, लालबागमध्ये थर्माकोलच्या मखरांची सर्रास विक्री

दादर, लालबागमध्ये थर्माकोलच्या मखरांची सर्रास विक्री

Subscribe

राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीचा निर्णय घेतला असला तरी त्याला काही ठिकाणी विक्रेत्यांनी साळसुदपणे फाटा दिल्याचे दिसत आहे

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असल्यामुळे मुबंईतील बाजारपेठांमध्ये सजावटीच्या विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीचा निर्णय घेतला असला तरी त्याला काही ठिकाणी विक्रेत्यांनी साळसुदपणे फाटा दिल्याचे दिसत आहे. दादर, लालबाग येथील बाजारांमध्ये थर्माकोलचे मखर मिळतात. दादरमध्ये खुलेआम तर लालबागमध्ये लपूनछपून थर्माकोलचे मखर विकण्यात येत आहेत, असे ‘आपलं महानगर’च्या पाहणीत दिसून आले आहे.

याआधी गणेशोत्सवात थर्माकोलच्या मखरांना सर्वाधिक मागणी होती. मात्र यंदा राज्य सरकारच्या आदेशामुळे मखर विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. या मखर विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात थर्माकोलच्या मखरांचा साठा असल्याची माहिती आहे. या विषयी राज्य शासनाच्या संबंधीत विभागाशी संपर्क साधला असताना संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisement -

थर्माकोलवरील बंदीला स्थगितीचा चुकीचा प्रसार

याविषयी विक्रेत्यांशी संवाद साधला असताना थर्माकोल बंदीला स्थगिती देण्यात आली आहे. म्हणून आम्ही विकतो, अशी चुकीची माहिती ते देत होते. लोकही या मखरांना पसंती देत होते. कारण दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे मखर अधिक स्वस्त दरात विकले जात आहेत. त्यामुळे महापालिका आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -