घरमुंबईउल्हासनगरमध्ये चक्क दहा रुपयात साडी

उल्हासनगरमध्ये चक्क दहा रुपयात साडी

Subscribe

साड्यांचा सेल लागल्याची माहिती कळताच महिला त्याचा लागलीच शोध घेतात. असाच एक साड्यांचा सेल उल्हासनगरमध्ये लागला आहे.

उल्हासनगर कॅम्प २ मधील रंग क्रिएशन या दुकानात अवघ्या दहा रुपयाला साडी मिळत आहे. विश्वास बसत नसेल ना तुम्हाला या गोष्टीवर. पण हे खरे आहे. उल्हासनगरमध्ये लातूरकर बालाजी साखरे उर्फ अश्विन यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा महासेल सुरु केला आहे.

भारतीय वेशभूषेत महिला साड्यांना विशेष महत्व देतात. साड्यांचा सेल हा महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. उल्हासनगर शहरातील कॅम्प २ मधील रंग क्रिएशन या दुकानात चक्क दहा रूपयांत साडी मिळत आहे. रंग क्रिएशन हा महिलांसाठी मान्सून धमाका ऑफर घेऊन आला आहे. ५ जूनपासून साड्यांचा हा महासेल सुरु केला आहे. जर तुम्हाला महिला बचत गटासाठी एकाच रंगाच्या साड्या घ्यायच्या असतील तर त्यादेखील रंग क्रिएशनमध्ये उपलब्ध आहेत.

- Advertisement -

पहिल्याच दिवशी ७५० साड्यांची विक्री

१० रुपयांत साडी, ही सुविधा फक्त सकाळी साडे १० ते १२ वाजेपर्यंत सुरु असते. सकाळच्या वेळी प्रथम येणाऱ्या १५० जणांना टोकन दिले जाते. त्यानंतर ही मंडळी चौथ्या मजल्यावर जाऊन साडीची खरेदी करतात. प्रत्येक महिलेला एका वेळी पाच साड्या दिल्या जातात. आज पहिल्या दिवशी तब्बल ७५० साड्यांची विक्री झाली असल्याचे रंग क्रिएशनचे मालक बालाजी साखरे यांनी सांगितले.

प्रत्येक जून महिन्यात आम्ही अशाप्रकारे आमच्या ग्राहकांची सेवा करणार आहोत. उरलेले ११ महिने व्यवसाय केला जातो. त्याची परतफेड म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. यामुळे दुकानात नवीन ग्राहक येतात. या साडीची मूळ किंमत १०० रुपये आहे, काही ग्राहक हे अन्य साड्यांची खरेदी करतात. त्यामधून हा तोटा भरून निघतो.
बालाजी साखरे, मालक, रंग क्रिएशन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -