घरमुंबईअडवली-भुतवली आदिवासीबहुल विभागातील शाळा बनली डिजिटल

अडवली-भुतवली आदिवासीबहुल विभागातील शाळा बनली डिजिटल

Subscribe

अडवली-भुतवली या स्मार्ट अशा नवी मुंबई शहरातील आदिवासी पाडा असलेला एक विभाग आहे. या भागातील पालिकेच्या शाळा क्रमांक ४१ मधील विद्यार्थीदेखील आता स्मार्ट बनले असून ही संपूर्ण शाळाच डिजिटल बनली आहे. सर्वच विषयांचे शिक्षण मुलांना स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून मिळू लागले आहे. डिजिटल शिक्षणाचे धडे मुलं आनंदाने घेत आहेत. या शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी या शाळेच्या भिंती चित्रांमधून बोलक्या केल्या आहेत.

आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते मंगळवार, ८ जानेवारी रोजी ४ वर्ग खोल्यांमधील डिजिटल बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. पाच डिजिटल वर्ग खोल्यांचे यापूर्वीच उद्घाटन झाले होते. आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव, नगरसेवक रमेश डोळे, शाळेचे मुख्याध्यापक भिकाजी सावंत आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. नवी मुंबई शहरात वाहत असलेली विकासाची गंगा आदिवासी पाड्यापर्यंतदेखील पोहोचली पाहिजे, यासाठी डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून स्मार्ट एज्युकेशनचा श्रीगणेशा पालिकेच्या या शाळेत केला आहे, असे मत आमदार गणेश नाईक यांनी मांडले. गणेश नाईक यांच्या शिक्षण व्हिजनमुळे शहरातील पालिका शाळांचा निकाल आज खासगी शाळांच्या तोडीस तोड लागतं आहे. डिजिटल बोर्डामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे, यामुळे ही मुलं खासगी शाळांमधील मुलांच्या स्पर्धेत बरोबरीने प्रगती करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अडवली-भुतवली येथील शाळा क्रमांक ४१ मध्ये ३० टक्के मुलं ही आदिवासी पाड्यातील आहेत. डिजिटल क्लासरुमध्ये त्यांना गणित, विज्ञान, सर्वसामान्य ज्ञान अशा सर्वच विषयांचा अभ्यास हातात पुस्तक न घेता स्मार्ट बोर्डवर करता येणार आहे.

- Advertisement -

डिजिटल क्लासरुमच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि स्मार्ट शिक्षण मिळू लागले आहे. शिक्षक अधिक टेन्कोसॅव्ही झाले आहे. आंतरराष्ट्रीय सुलेखनकार अच्युत पालव आणि त्यांच्या सहकार्यांनी शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. विविध विषयांच्या धड्यांमधील मजकूर भिंतीवर अर्थपूर्ण चित्रांतून कलात्मक पध्दतीने चितारला आहे.
– भिकाजी सावंत, मुख्याध्यापक, पालिका शाळा

डिजिटल स्कूल खूप आवडते. सर्व विषय स्मार्ट बोर्डवर शिकवतात. आता शाळेला दांडी मारावीशी वाटत नाही.
– योगिता शिंदे, विद्यार्थीनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -