घरमुंबईमुंबईत कोरोनाची दुसरी लाट दिवाळीनंतर

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट दिवाळीनंतर

Subscribe

 

कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या मुंबईतच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा ईशारा टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या तज्ञांनी दिला आहे. विशेषतः हिवाळ्यातला आणि दिवाळी सणाच्या कालावधीनंतरचा काळ हा अधिक धोक्याचे असल्याचे टीआयएफआरच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबईतील कोरोनाच्या आकडेवारीच्या आधारावरच टीआयएफआरने हे संशोधन मांडले आहे.

- Advertisement -

टीआयएफआरने २६ ऑक्टोबरच्या माहितीचा आधार घेत कोरोनाची दुसरी लाट ही दिवाळीनंतर येईल असा ईशारा दिला आहे. म्हणूनच हा धोक्याचा काळ असेल असे टीआयएफआरचे म्हणणे आहे. याआधी जशी मे महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली होती, त्यानुसारच नोव्हेंबरमधील वाढही दिसून येईल असे टीआयएफआरने स्पष्ट केले आहे. कोरोनाची लाट ही झोपडपट्टी भागात सर्वाधिक तर अन्य रहिवासी वस्तीत अधिक असेल. शहरात ८० टक्के झोपडपट्टी भागात या लाटेचा परिणाम राहील. तर इतर वस्त्यांमध्ये ५५ टक्के इतक्या प्रमाणात या लाटेचा परिणाम दिसून येईल. महत्वाचे म्हणजे या लाटेचा परिणाम हा जानेवारी २०२१ पर्यंत दिसून येईल. पण ही लाट याआधीच्या कोरोनाच्या लाटेपेक्षा छोटी असू शकते. याआधी गणपतीनंतर कोरोनाची लाट आल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळेच मुंबईत लोकल सुरू होत असताना कोरोनाची लाट येणे ही मुंबई शहरासाठी धोक्याची घंटा आहे. टीआयएफआरचे डॉ संदीप जुनेजा यांनी स्पष्ट केले आहे की या लाटेचा परिणाम हा जानेवारी महिन्यापर्यंत असू शकतो.

मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली असल्यानेच या लाटेचा धोका तुलनेत कमी आहे. मुंबईत कमी अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. म्हणूनच हर्ड इम्युनिटीचा परिणाम हा कोरोनाच्या लाटेवर असणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे एक वृत्त दिले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत लोकल ट्रेन आणि शाळा, कॉलेज सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या काळात हॉस्पिटलायजेशनमध्ये आणि गंभीर रूग्णांची संख्या जास्त असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. हॉस्पिटलायजेशनमध्ये दिवसाला दिवसापोटी २३०० ते ३२०० इतक्या रूग्णांची वाढ होऊ शकते. तर जानेवारीत ही वाढ २०० रूग्णांपासून ते २ हजार इतकी असू शकते. या काळात मृत्यूचाही आकडा असू शकतो. तर गंभीर रूग्णांची संख्याही वाढू शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

राज्य सरकार तयार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या लाटेवर प्रतिक्रिया देत कोरोनाच्या लाटेसाठी राज्य सरकार तयार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची लाट येण्याची शक्यता असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. पण राज्य सरकारच्या टास्क फोर्सनेही याबाबतचा अभ्यास केला आहे. गेल्या आठ महिन्यातला अनुभव पाहता या लाटेचा सामना नक्कीच करू असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -