घरमुंबईअमित शहा आणि मोहन भागवतांची गुप्त बैठक !

अमित शहा आणि मोहन भागवतांची गुप्त बैठक !

Subscribe

अमित शहा आणि मोहन भागवत यांच्यात झालेली ही बैठक सर्वपक्षीय गटनेत्यांच्या अगोदर झाली. या बैठकीदरम्यान राज्याच्या घडामोडीचा आढावा घेण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यात मुंबईमध्ये बैठक झाली. या दोघांमध्ये झालेली ही बैठक जवळपास अर्धातास सुरु होती. मुंबईतील आरएसएसच्या यशवंत भवन कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीत राज्याच्या घडामोडींवर तपशीलावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.  मराठा आरक्षणासाठी राज्यभर पेटलेला वणवा कमी होत नाही आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे भारतीय जनता पक्षाच्या छबीवर परिणाम झाल्याच ठाम मत झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका पाहता येत्या काळात, मराठा समाजाच्या आरक्षणावरुन भाजपला इतर जातींचा नेमका कसा फायदा होऊ शकतो ? याबद्दल मोहन भागवत आणि अमित शहा यांनी सविस्तर चर्चा केल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही

दरम्यान ‘मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. भाजपमध्ये जे निर्णय होतात ते सामूहिक पध्दतीनेच होतात’, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मोहन भागवत आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची बैठक झाली. मात्र, बैठकीदरम्यानचा तपशील आम्हाला कोणालाही माहित नसल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवले.

- Advertisement -

सर्वपक्षीय बैठकी अगोदरच गुप्त बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकी अगोदरच, अमित शाह आणि मोहन भागवत यांची गुप्त बैठक झाली होती. दरम्यान मोहन भागवत आणि अमित शहा यांच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे. मोहन भागवत यांच्यासोबतची बैठक संपवल्यानंतर अमित शहा यांनी सह्याद्री अतिथी गृहात बसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीचा अहवाल घेत त्याविषयी चर्चा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -