घरमुंबईचिमुरडीवर वृद्धाचा अतिप्रसंग; लैंगिक शिक्षणामुळे झाली उकल

चिमुरडीवर वृद्धाचा अतिप्रसंग; लैंगिक शिक्षणामुळे झाली उकल

Subscribe

हिंगोली येथे राहणारी चिमुरडी तिच्या आजोबांसोबत ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यासठी मुंबईत आली होती. मात्र तिच्या सोबत येणाऱ्या आजोबांनी ती एकटी असल्याची संधी साधत अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हिंगोली येथे राहणारी ९ वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या आजोबांनीच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या शाळेमध्ये लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जातात. या शिक्षणामुळे चिमुरडीला आजोबांचा स्पर्श वाईट असल्याचे लक्षात येताच तिने याबाबत तक्रार केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत वृद्धाला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.

नेमके काय घडले?

आईवडिलांचे छत्र हरपलेली ही चिमुरडी हिंगोली येथील एका अनाथश्रामात वाढते. ही मुलगी ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी तिच्या आजोबांनासोबत मुंबईला आली होती. रुग्णालयात आल्यानंतर तिला एका रुममध्ये बसवण्यात आले. तिच्यासोबत येणाऱ्या आजोबांने नात एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर अतिप्रसंग केला. काही कारणासाठी आजोबा बाहेर गेला. त्याचदरम्यान या चिमुरडीने नर्सला जाऊन घडलेला प्रकार सांगितला. नर्सने देखील तत्काळ दखल घेत रुग्णालय प्रशासनाला ही बाब कळवली. रुग्णालयाने तातडीने आग्रीपाडा पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी या वृद्धाला अटक केली.

- Advertisement -

मुलीविषयी थोडस…

ही चिमुरडी मूळची हिंगोलीची आहे. या मुलीच्या ह्रदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. त्यानंतर या मुलीवर ह्रदयाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्या कारणाने हिला मुंबईत जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार या मुलीला तिच्या आजोबांसोबत मुंबईत पाठवण्यात आले. या मुलीला एका सामाजिक संस्थेने मदतीचा हात देखील दिल्याने या मुलीच्या ह्रदयावर २३ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र २२ सप्टेंबर रोजी आजोबांने केलेल्या अतिप्रसंगामुळे चिमुरडी घाबरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -