घरमुंबईयुवक पतपेढीतील ज्येष्ठ ठेवीदारांची फसवणूक

युवक पतपेढीतील ज्येष्ठ ठेवीदारांची फसवणूक

Subscribe

सहकार मंत्र्यांकडे तक्रार

वसईतील युवक पतसंस्थेत झालेल्या साडेआठ कोटी रुपयांच्या अपहारात ज्येष्ठ ठेविदारांची फसवणूक झाली असून, वृद्धपकाळासाठी गुतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी सहकार मंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.वसईतील युवक सहकारी पतसंस्थेत अनेक नागरिकांनी आपले निवृत्ती वेतन वृद्धपकाळात येणार्‍या अडचणी, मुलींचे लग्न,आजार यासाठी गुंतवले होते. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपली आयुष्यभराची पुंजी त्यात गुंतवली होती. मात्र,त्यांच्या या 8 कोटी 56 लाख 19 हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे उघडकिस आले होते. याप्रकरणी कर्मचार्‍यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संचालक मंडळाच्या हलगर्जीपणामुळे हा घोटाळा झाल्याचा आरोप युवक सहकारी पतसंस्थेच्या समन्वयक समितीने केला आहे.

संचालक मंडळांने कर्जवसुली सुरू केली आहे. त्यातून आलेली रक्कम गरजवंत, ज्येष्ठ नागरिक अथवा आजारी ठेवीदारांना न देता संचालक मंडळ आपल्या नातलग आणि हितचिंतकांमध्ये वाटप करतात. असाही आरोप समन्वय समितीने सहकार मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. डावलले गेलेले बहुतांश ठेवीदार कॅन्सर, हृदयविकार, गुडघे दुखीने बेजार आहेत. त्यांना पैशांची नितांत गरज आहे. तशी विनंती उपनिंबधक, पोलीस आणि सहकार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मात्र,त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे गरीब, आजारी ठेवीदारांचे पैसे मिळवून द्यावेत असे साकडे समन्वय समितीने सहकार मंत्र्यांना घातले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -