घरमुंबईमेट्रो ३ प्रकल्पात सेन्सरचे तंत्रज्ञान

मेट्रो ३ प्रकल्पात सेन्सरचे तंत्रज्ञान

Subscribe

पूर तसेच भूकंपाच्या काळात मदत होणार

मुंबईसारख्या समुद्रकिनारा लाभलेल्या शहरात भुयारी मेट्रो ३ प्रकल्पात पूर परिस्थितीचाही तितकाच काळजीपूर्वक विचार करण्यात आला आहे. तसेच भूकंपाच्या नैसर्गिक संकटांचाही गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. नैसर्गिक संकटाची जाणीव आधी मिळण्यासाठी लिफ्टमध्ये सेन्सरचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना बचाव कार्यात सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य होईल. सिद्धिविनायक ते कफ परेड या मेट्रो ३ च्या प्रकल्पात लिफ्टचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. जगभरातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्टेशनच्या ठिकाणच्या लिफ्टसाठी करण्यात आलेला आहे.

प्रकल्पाच्या ठिकाणी स्टेशनमध्ये पाणी साचल्यानंतर सेन्सर कार्यरत होऊन लिफ्ट ठराविक अंतरावरच थांबेल अशी लिफ्टमध्ये सुरक्षित काळजी घेण्यात आली आहे. तसेच साचणार्‍या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपिंग सिस्टिमही देण्यात आली आहे. भूकंपासारख्या संकटातही सेन्सरमुळे लिफ्ट ठराविक सुरक्षित अंतरावर थांबेल. त्यामुळे प्रवाशांची सुटका करणे शक्य होईल. लिफ्टच्या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे रिमोट मॉनिटरींग सिस्टिम. या सिस्टिममुळे बंद पडणार्‍या तसेच दुरूस्ती आणि देखभालीची आवश्यकता असणार्‍या लिफ्ट रिमोटने मॉनिटर करणे शक्य होईल. त्यासाठी प्रत्येक स्टेशनवर मॉनिटरींगसाठीची यंत्रणा असणार आहे. तसेच स्काडा (सुपरव्हायझरी कंट्रोल अँड डेटा अ‍ॅक्विझिशन) तंत्रज्ञानाचा वापर करूनही गर्दीवर नियंत्रण करणे शक्य होणार आहे. या लिफ्ट अपंगासाठी सोयीच्या असणार आहेत. तसेच प्रत्येक स्टेशनवर लिफ्ट दोन टप्प्यात असणार आहे. सरासरी ३ ते ४ एंट्री आणि एक्झिट पॉईंट प्रत्येक स्टेशनवर असतील, तर किमान दोन लिफ्ट प्रत्येक स्टेशनवर असणार आहेत. सर्वाधिक अर्थात ९ लिफ्ट बीकेसी स्थानकात असतील. रिअल टाईम मॉनेटरींग आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन या तंत्रज्ञानाचा वापर मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गतच्या स्थानकांवर होणार आहे. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणावर बचतही होणार आहे.

- Advertisement -

मुंबई मेट्रो ३ मार्गिकेच्या १४ मेट्रो स्थानकांच्या (सिद्धिविनायक ते कफ परेड मेट्रो स्थानक) लिफ्ट कार्यप्रणालीचा महत्त्वपूर्ण करार आज करण्यात आला.’युआंडा – रॉयल कन्सोर्टियम चायना कन्सोर्टियम’ यांच्यासह हा करार झाला आहे. ही कंपनी स्थानकांच्या ठिकाणी लिफ्टबांधणी करणार आहेत. या कामामध्ये एकूण १४ स्थानकांच्या लिफ्टचे डिझाईन, निर्मिती, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसह इतर संबंधित ८६ प्रकारची कामे ही कंपनी करणार आहे. जास्त प्रवाशांच्या ये- जा करिता या एस्केलेटरचे विशेष मॉनिटरींग करण्यात येणार आहे.

मेट्रो ३ च्या भुयारी प्रवासात लिफ्ट्सची अंमलबजावणी हा प्रवाशांच्या आरामदायक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. मेट्रो ३ साठी मजबूत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत लिफ्ट्स प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा आमचा उद्देश आहे’, अशी प्रतिक्रिया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली. कंपनीकडून वेळेत कार्य पूर्ण केले जाणे अपेक्षित आहे, त्यामुळे हा प्रकल्प निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केला जाऊ शकेल असेही त्यांनी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -