घरमुंबईमुंबईत दोन करोना रुग्णांची प्रकृती गंभीर

मुंबईत दोन करोना रुग्णांची प्रकृती गंभीर

Subscribe

मुंबईतील करोना बाधीत रुग्णांवर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत शुक्रवारी करोनाचे आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २० जणांवर गेली आहे. या रुग्णांवर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारी डी विभागातील ६२ वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले आहे. ही व्यक्ती युकेमधून १४ मार्चला मुंबईत आली होती. त्यांना १८ तारखेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णास मधुमेह आणि कर्करोग आजार असून त्यांच्यावर किमोथेरपीदेखील सुरू आहे. एफ उत्तर विभागातील ३८ वर्षीय व्यक्ती तुर्की येथून प्रवास १४ तारखेला मुंबईत परतली. या रुग्णाला १८ मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे २० तारखेला करोना पॉझिटिव्ह असे निदान करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अलगीकरण

कल्याणची ५३ वर्षीय व्यक्ती दुबईतून प्रवास करुन ४ तारखेला कल्याणमध्ये घरी पोहोचली. पण, तीला १९ तारखेला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि शुक्रवारी करोना पॉझिटिव्ह म्हणून निदान करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी ११८ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अलगीकरण  करण्यात आले आहे. बाह्यरुग्ण विभागात एकूण ५४० रुग्ण दाखल झाले होते. तर, ११४ संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. डिस्चार्ज झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ८३ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -