घरमुंबईशरद पोंक्षे यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार

शरद पोंक्षे यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार

Subscribe

अभिनेत्री उषा नाईक यांना गंगा जमुना पुरस्कार जाहीर , ठाण्यात 22 डिसेंबरला पुरस्काराचे वितरण

अभिनेता शरद पोंक्षे यांना जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार तर गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणार्‍या सिने-नाट्य अभिनेत्री उषा नाईक यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. दरम्यान साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल प्रशांत डिंगणकर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल बाळासाहेब खोल्लम तर लक्षवेधी कलावंत माधुरी करमरकर यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 22 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार्‍या जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोह समारंभामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

राज्याचे गृह, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडणार आहे. या समारंभाला खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुध्दे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, प्रमोद पाटील, अ‍ॅड. निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा व समाजकल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती अमर पाटील, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी, जनकवी पी. सावळाराम कला समिती अध्यक्षा डॉ.कल्पना पाठारे आणि जनकवी पी.सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय सावळाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -