घरमुंबईनवी मुंबईत नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

नवी मुंबईत नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

Subscribe

शिवसेनेचे नवी मुंबई येथील नामदेव भगत यांच्यावर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही.

नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे नामदेव भगत यांचा विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप त्यांना अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. भगत यांनी त्यांच्या फार्महाऊसवर नेऊन विनयभंग केल्याचा आरोप १९ वर्षीय तरुणीने केला आहे. मात्र, भगत यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आपली प्रतिमा खराब करण्यासाठी खोटे आरोप लावण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. नामदेव भगत हे नवी मुंबईतील नेरुळमधून शिवसेनेचे नगरसेवक असून स्थायी समिती सदस्य आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी सिडको संचालकपदही सांभाळलं होतं.

या घटनेबाबत मुलीने दिलेल्या माहिती नुसार, मागील काही दिवसांपासून ही तरुणी भगत यांना ओळखत होती. पीडित मुलीला कामाचे कारण देत भगत यांनी आपल्या उरण तालुक्यातील फार्महाऊसवर बोलावले होते. फार्महाऊसवर या मुलीचा विनयभंग करण्यात आला असल्याचे मुलीने आपल्या जबानीत म्हटलं आहे. पोलिसांनी नामदेव भगत यांच्याविरोधात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -