घरमुंबईठाणे महापालिकेच्या महासभेत अवतरली महाशिवआघाडी

ठाणे महापालिकेच्या महासभेत अवतरली महाशिवआघाडी

Subscribe

सत्ताधारी शिवसेनेला सावरण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस सरसावली आणि भाजप एकटी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वात महत्वाचे असे कि, थीमपार्क भ्रष्टाचाराला वाचा प्रथम राष्ट्रवादी पक्षाने सभागृहात फोडली. त्यानंतर सर्व पक्षीयांच्या समितीने हा अहवाल तयार केला.

थीम पार्कच्या भ्रष्टाचाराबाबत मंगळवारी महासभेत भाजपने सत्ताधारी आणि प्रशासनाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादी हे शिवसेनेला आणि प्रशासनाला घेरतील आस भाजपच्या नगरसेवकांचा अंदाज होता. मात्र सभागृहात महाशिवआघाडी अवतरली. सत्ताधारी शिवसेनेला सावरण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस सरसावली आणि भाजप एकटी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वात महत्वाचे असे कि, थीमपार्क भ्रष्टाचाराला वाचा प्रथम राष्ट्रवादी पक्षाने सभागृहात फोडली. त्यानंतर सर्व पक्षीयांच्या समितीने हा अहवाल तयार केला.

‘हिंमत असेल तर सिद्ध करून दाखवा’; शिवसेना नगरसेवकांचे आव्हान

भाजपच्या सदस्यांच्या ड्राफ्ट बनवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान नसताना समितीने तयार केलेल्या अहवालाचे श्रेय घेऊन तो परस्पर फोडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. ‘थीमपार्क प्रकरणी समितीचा अहवाल हा स्वतः तयार केल्याचे भासवून सत्ताधाऱ्यांचाही बुरखा फाडण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी हिंमत असेल तर हे आरोप सिद्ध करून दाखवावेच’, असे खुले आव्हान शिवसेनेने दिले. या संपूर्ण वादंगामध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोधात भाजप असे महाआघाडीचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.

- Advertisement -

‘योगदान नसणारे श्रेय घेण्यासाठी पुढे आले’

मंगळवारी महासभेत राष्ट्रवादी पक्षाच्या नजीब मुल्ला यांनी थीम पार्कचा विषय महासभेत काढला तेव्हा थीमपार्क भ्रष्टाचार प्रकरण सर्वात प्रथम सभागृहात मी मांडले. त्यानंतर समितीने मसुदा तयार केल्याचे नजीब मुल्ला यांनी सभागृहात सांगितले. ज्यांनी हा भ्रष्टाचारा उघड केला आणि ज्यांनी सर्व तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास करून मसूदा तयार केला ते सर्व राहिले बाजूला मात्र ज्यांचे काही योगदान नाही ते मात्र या सर्व गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी समोर आले आहेत, असा आरोप मुल्ला यांनी नारायण पवार यांच्यावर केला. अशा प्रकारे जर समितीचा अहवाल समितीला विश्वासात न घेता फोडला जात असेल तर मग जेव्हा स्टँडिंगला या विषयाला का वाचा फोडली नाही? त्यावेळी कोणत्या नेत्याचा दबाव होता? कोणत्या नेत्याचे फोन त्यावेळी आले होते? असे अनेक प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केले.

सभागृहनेत्यांनी भाजपवर केला हल्लाबोल

थीमपार्क प्रकरणावर सभागृहात नरेश म्हस्के बरसले. थीमपार्कचा विषय बंद का झाला? समितीचा आवाहल तयार करून तो सभागृहात सादर करण्याऐवजी इतर पक्ष हे चोर असलयाचे दाखविण्याची भाजपाची भूमिका हे शोभनीय नसल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. दरम्यान सभागृहात सभागृहनेते नरेश म्हस्के यांचे आरोप खोदून काढण्याचा प्रयत्न आणि धडपड करणारे भाजप गटनेते हे सक्षमपणे बाजू मांडण्यात असफल झाले. भाजपच्या दोन सदस्यांनी हा अहवाल महापौरांकडे सादर केला असल्याचे पवार यांनी सभागृहात सांगितले. या मुद्द्यावर नजीब मुल्ला यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत,असा कोणताही विषय समितीमध्ये झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. तर महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही असे कोणताही विषय झाला नसल्याचे महापौरांनीही स्पष्ट केल्यानंतर नारायण पवार अक्षरशः उघडे पडले. त्यानंतर हा अहवाल सर्व नगरसेवकांना देण्यात यावा, अशी मागणी नजीब मुल्ला आणि मिलींद पाटणकर यांनी सभागृहात केल्यावर या वादावर पडदा पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -