घरमुंबईआरोग्य, पोलिस विभागातील भरती, अजितदादांचा मोठा खुलासा

आरोग्य, पोलिस विभागातील भरती, अजितदादांचा मोठा खुलासा

Subscribe

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग, पोलिस विभागात सध्या अनेक पदांवर मनुष्यबळाची चणचण भासत आहे. जनतेच आरोग्य आणि जनतेच्या सुरक्षेसाठी भरती करणे गरजेचे आहे. कारण त्याठिकाणी माणसांची मोठी चणचण भासत आहे. म्हणूनच त्याठिकाणी तातडीने भरती करणे गरजेचे आहे. भरती केल्यानंतर पोलिस कामाला यायला एक वर्षे लागते. या एका वर्षाच्या कालावधीत ट्रेनिंगसारख्या गोष्टींचा समावेश असतो. मराठा आरक्षाच्या बाबतीत जानेवारीत सर्वोच्च न्यायालयात प्रश्न सुटेल आणि निकाल लागेल असे वाटत होते. पण आता सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण फेब्रुवारी गेले आहे. ही सगळी भरती प्रक्रिया करताना कोणताही घटक वंचित राहणार नाही. भाजपचा भरती प्रक्रियेला विरोध होत आहे. पण कुठल्या घटकाला समाजाला वंचित न ठेवता या भरती प्रक्रियेत मार्ग काढण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी सरकारचा राहील, असे अजितदादा म्हणाले. अजितदादांनी रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे.

शिवेंद्रसिंह राजे यांनी विकास कामांसाठी भेट घेतली 

मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. राज्याचे अनेक आमदार, खासदार हे आपल्या भागातील विकास कामे घेऊन येत असतात. शिवेंद्रसिंह राजे यांचे विकास कामाचे काही प्रश्न होते. त्याबाबतच्या बैठका लावायच्या होत्या, म्हणूनच ते भेटीसाठी आले होते. मंत्रालयात या दोन्ही विषयाची बैठक लावेन असे आश्वासन मी दिले आहे. मी विरोधी पक्षात असताना माझ्या मतदारसंघातील अडचणी, प्रश्न हे सत्ताधाऱ्यांकडे घेऊन जात होतो, असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजितदादा यांच्या भेटीला साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे आल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. पण शिवेंद्रसिंह राजे यांची भेट केवळ विकास कामांसाठी होती असे अजितदादा यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -