घरमुंबईकिल्ल्यांतून जागवला शिवरायांचा इतिहास

किल्ल्यांतून जागवला शिवरायांचा इतिहास

Subscribe

युवा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियात अडकलेल्या आजच्या तरुणी पिढीसमोर गडकिल्ले साकारून विरारच्या युवा प्रतिष्ठानने शिवरायांचा इतिहास जागवण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे.

पुस्तके, इतिहास आणि गडकिल्ल्यांपासून दूर जात आजची पिढी विशेषतः विद्यार्थी वर्ग व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या नादाला लागली आहे. त्यामुळे ही पिढी भारतीय संस्कृती, गडकिल्ले, सण आणि इतिहासापासून लांब चालली आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेवून विरारच्या युवा प्रतिष्ठानने दिवाळीच्या निमित्ताने गडकिल्ले आणि छत्रपती शिवाजींचा इतिहास या पिढीसमोर सादर केला. त्यासाठी नाना-नानीपार्क-2 या सोसायटीत फक्त मातीचा वापर करून रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, प्रतापगड यांची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आली. तरुणांची धडपड पाहून किल्ल्यांसाठी एक ट्रक माती नगरसेवक प्रशांत राऊत आणि स्वप्नील पाटील यांनी उपलब्ध करून दिली.

- Advertisement -

कामाहून संध्याकाळी आल्यावर बालगोपाळांना सोबत घेवून पाच-सहा तास परिश्रम करून युवाच्या अक्षय वांद्रे, सिद्धेश घाडीगांवकर, अनिकेत साटम, दिवेश बोरकर, अमित कुळये, प्रशांत जंगम, रमेश देवळेकर, जितेंद्र जोंधळे, ध्रुव जोंधळे, हर्षिता धायाळकर, महेश देसाई, संतोष गावडे, सुमित विश्वासराव यांनी हे किल्ले उभारले. रायगड किल्ला, त्यातील महादरवाजा, टकमक टोक, हिरकणी बुरुज, चीत दरवाजा, बाजारपेठ हुबेहुब साकारण्यात आल्यामुळे हे किल्ले पाहण्यासाठी हजारो लोकांनी दररोज गर्दी केली. विपरित परिस्थितीत शिवरायांनी हे किल्ले कसे सर केले. तसेच किल्लांची व्यवस्था कशी ठेवली, याची माहिती तरुणांनी वेळोवेळी प्रेक्षकांना दिली.

युवाच्या या परिश्रमाचे आणि अभिनव संकल्पनेचे सर्व थरातून स्वागत करण्यात येत आहे. या युवाप्रमाणेच तालुक्यातील सोसायट्यांनी आपापल्या परिसरात गड किल्ले उभारावेत आणि त्यांची माहिती, इतिहास नव्या पिढीला सांगावा.त्यांच्यात इतिहासाची गोडी निर्माण करावी, असे आवाहन बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी यावेळी केले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -