घरमुंबईशिवसेनेच्या घंटानाद आंदोलनाकडे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पाठ

शिवसेनेच्या घंटानाद आंदोलनाकडे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पाठ

Subscribe

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळे आहेत. या किल्ल्यावर हिंदू समाजाला बकरी ईदच्या दिवशी आरती आणि घंटानाद करण्याकरिता बंदी घालण्यात येते. त्यामुळे तत्कालिन ठाणे जिल्हा प्रमुख कै.आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे घंटानाद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती.

बकरी ईद दिवशी दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. त्या काळात हिंदुंना दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी मातेच्या मंदिरात घंटानाद आणि आरती करण्यास बंदी घालण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसैनिकांनी हातात भगवे ध्वज घेऊन दुर्गाडीवर चाल केली. मात्र पोलिसांनी त्यांना लालचौकी येथे रोखून धरले. ठाणे जिल्हाप्रमुख कै.आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केली आहे. मात्र त्यांच्या मृत्यूपश्चात आंदोलनातील गर्दी ओसरू लागली आहे. या आंदोलनाकडे शिवसेनेच्या अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे प्रकर्षाने दिसून आले.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळे असून, दोघांनीही आपले हक्क प्रस्थापित केले आहेत. बकरी ईदनिमित्त दोन धर्मांमध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून हिंदू समाजाला बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरती आणि घंटानाद करण्याकरिता बंदी घालण्यात येते. याचा निषेध करण्यासाठी तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख कै.आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलनाची सुरूवात झाली. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी हे आंदोलन छेडले जाते. या दिवशी हा बंदीहुकूम मोडण्यासाठी शिवसैनिक दुर्गाडीवर चाल करतात.

- Advertisement -

सोमवारी शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी टिळक चौक येथून घंटानाद आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्याकडे कूच करीत असतानाच लाल चौकी येथे पोलिसांनी शिवसैनिकांना बॅरिगेट लावून अडवून धरले. शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने जोरदार प्रतिकार केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. कै.आनंद दिघेंच्या काळात जिल्हयातील शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी असे हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी होत असत. पण आता कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक आणि पदाधिकारीही आंदोलनात सहभागी झाले नसल्याचे चित्र दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -