घरमुंबईधक्कादायक : पालिकेची परवानगी न घेता मालाडमध्ये तब्बल एक हजार झाडांची कत्तल

धक्कादायक : पालिकेची परवानगी न घेता मालाडमध्ये तब्बल एक हजार झाडांची कत्तल

Subscribe

मेसर्स दिनशॉ ट्रस्ट आणि मेसर्स फेरानी हॉटेल्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या असलेल्या भूखंडावरील जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे समोर आले.

मुंबईमधील मालाड (malad, mumbai) मध्ये झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाड मधील एका ट्रस्टच्या मालकीच्या भूखंडावर असलेल्या 560 आणि त्याच भूखंडाला लागून असलेल्या दुसऱ्या जागेवरील 605 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. पालिकेच्या पी उत्तर विभाग उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही भूखंडाचे मालक आणि रखवालदार यांच्या विरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मालाड पुर्वेकडे असलेल्या नागरी निवारा (nagari nivara) परिषदेच्या बाजूला जे भूखंड होते त्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे अशी तक्रार स्थानिकांनी पालिकेच्या पी उत्तर विभागाच्या कार्यलयात केली. यावरच पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी पाहणी केली. त्यानंतर मेसर्स दिनशॉ ट्रस्ट आणि मेसर्स फेरानी हॉटेल्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या असलेल्या भूखंडावरील जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे समोर आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने याचे मोजमाप केले असता जवळपास 560 झाडे ही बुंध्यापासून कापण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही असे सांगत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भूखंडाचे मालक, रखवालदार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करत याच विभागात बेकायदेशीररीत्या आणखी एके ठिकाणी वृक्षतोड (felling of trees) झल्याचा प्रकार उघडकीस आला. याच भागाला लागून असलेल्या जंगल परिसराला 2018 साली आग लागली होती. याच घटनेचा फायदा घेत या भागात वृक्षतोड करण्यात आली. दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांनी इन्फिनिटी आयटी पार्कशेजारी असलेल्या भूखंडाची पाहणी केली केली. या ठिकाणी असलेली 310 सागाची, 218 शेवरची आणि पळसाची 77 अशी सुमारे 605 झाडे कोणतीही परवानगी न घेता कापल्याचे दिसून आले. 2018च्या घटनेनंतर 2022मध्ये या प्रकरणात भूखंडाचे मालक आणि त्यांच्यासोबतच रखवालदारांवर महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे ही वाचा – मुंबईच्या हवेचा दर्जा खालावल्याचा केंद्राकडून इशारा; पुढील 2 दिवस वातावरण ‘जैसे थे’च

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -