घरमुंबईसिद्धिविनायक मंदिराला नोटीस

सिद्धिविनायक मंदिराला नोटीस

Subscribe

एफक्रा अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व संस्थाना दरवर्षी वार्षिक अहवाल सादर करणे बंधनकारक असते. या अहवालात आय-व्यय पत्रक, पावत्या- देयके पत्रक, ताळेबंद, इत्यादींचा समावेश असणे आवश्यक असते.

सिद्धिविनायक मंदिर देवस्थानाला देशातूनच नाही तर परदेशातूनही निधी मिळतो. परंतु विदेशांतून मिळालेल्या निधीचा तपशील न दिल्यामुळे सिद्धीविनायक मंदिराला केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे देशातील तब्बल १ हजार ७७५ देवस्थानांना या संदर्भात नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराखेरीज मद्रास ख्रिश्चन कॉलेज, स्कोडा ऑटो इंडिया व राजस्थान विद्यापीठ या संस्थांनी देखील नोटीसा पाठविल्या आहेत.

संस्थानी केला काणाडोळा

विदेशांतून मिळणाऱ्या निधीचा तपशील १ डिसेंबरपर्यंत विवरणपत्र सादर करणे अनिवार्य असते. असे केले नाही तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. यंदा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नोटिसकडे दुर्लक्ष केल्यास या सर्व संस्थावर विदेशी नियमन कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्रालयाने या संस्थाना बजावले आहे.

- Advertisement -

अशी केली जाते ऑनलाईन नोंदणी

एफक्रा अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व संस्थाना दरवर्षी वार्षिक अहवाल सादर करणे बंधनकारक असते. या अहवालात आय-व्यय पत्रक, पावत्या- देयके पत्रक, ताळेबंद, इत्यादींचा समावेश असणे आवश्यक असते. हा सर्व तपशील प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर ९ महिन्यात देणे बंधनकारक असते. शिवाय ज्यांना विदेशातून निधी मिळत नाही त्यांनी देखील विवरणपत्र निल स्वरुपात भरणे आवश्यक असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -