घरमुंबईउल्हासनरात सिंधी बांधवांच्या 'चालिया उत्सवा'ची सांगता!

उल्हासनरात सिंधी बांधवांच्या ‘चालिया उत्सवा’ची सांगता!

Subscribe

सिंधी समाजातील चाळीस दिवसांचा अखंड ज्योती महोत्सव (चालिया उत्सव) मागील काही दिवसांपासून सुरु होता. सिंधी बांधवानी चाळीस दिवस उपवास ठेवून काल, शुक्रवारी या उपवासाची सांगता केली. उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात सिंधी समाजाची वस्ती आहे. त्यामुळे या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात सिंधी भाविक झुलेलाल मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे हजारो भाविक उपवासाच्या सांगताच्या वेळी मटकी पाण्यात सोडण्याच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. या उत्सवात झुलेलाल मंदिरांना विशेष सुविधा देण्यात आली असून मंदिरात कथा, आरती, भजन आणि कीर्तन असलेले धार्मिक कार्यक्रम हे दिवसभर सुरु असतात.

- Advertisement -

या उपवासाच्या दिवसात, महिला घरातून दररोज चार किंवा पाच मातीचे दिवे घेतील आणि देवाची उपासना करतात. जीवन सुखी आणि लोककल्याणकारी होण्यासाठी हा वेगवान उत्सव साजरा केला जातो. भगवान झुलेलाल यांच्या या उत्सवात पाण्याची पूजा केली जाते. हा सिंधी समाजाचा सर्वात मोठा सण मानला जातो. अत्यंत उत्साहामध्ये हा सोहळा संपन्न झाला. पोलिसांकडून देखील अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता, तर वाहतुकीत देखील अनेक बदल केलेले पाहायला मिळाले. चाळीस दिवसाच्या उपवासाची सांगता पाण्यात मटकी सोडून करण्यासाठी झुलेलाल मंदीरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. त्यात महिला मोठ्या संख्येने होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -