घरमुंबईलोहमार्ग पोलिसांच्या डोक्यावर स्मार्ट टोपी

लोहमार्ग पोलिसांच्या डोक्यावर स्मार्ट टोपी

Subscribe

3 हजार 500 बेस बॉल कॅपची रेल्वेकडून खरेदी

लोहमार्ग पोलिसांना जुनी टोपी वापरताना अनेक अडचणी भेडसावत होत्या. जुनी टोपी डोक्यात व्यवस्थित न बसणे, रेल्वे मार्गावर गुन्हेगारांचा पाठलाग करताना टोपी पडणे, अशाप्रकारच्या तक्रारी येत होत्या.त्यामुळे बर्‍याच समस्यांना लोहमार्ग पोलिसांना येत होत्या. या समस्यांना लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांसाठी 70 वर्ष जुन्या टोपीच्या जागी आता नव्या बेसबॉल कॅप देण्यात आल्या आहेत. मात्र पोलीस कार्यालयीन तपासणी आणि परेडसाठीच जुनी टोपी वापरण्यात येणार आहे.

लोहमार्ग पोलिसांच्या गणवेशात बेसबॉल खेळातील टोपीप्रमाणे अतिरिक्त टोपीचा समावेश करण्यात आले आहे. विशेष, म्हणजे शहर पोलिसांना ही बेस बॉल टोपी मिळाली होती. मात्र लोहमार्ग पोलिसांना या टोपीची प्रतिक्षा करावी लागली होती. मात्र आता मुंबर्ई विभागातील 3 हजार 500 लोहमार्ग पोलिसांसाठी ही बेस बॉल टोपी देण्यात आली आहे. तर 70 वर्ष जुन्या टोपीची सक्ती केवळ पोलीस कार्यालयीन तपासणी आणि परेडसाठीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर बंदोबस्ताच्या वेळी किंवा आरोपीला पकडताना, प्रसंगी परिस्थिती हाताळताना पोलिसांना डोक्यावरील टोपीही सांभाळावी लागते. घट्ट बसत नसल्याने ती डोक्यावरून वारंवार पडत होती.

- Advertisement -

सोबतच टोपी न घातल्यास वरिष्ठांकडून कारवाई सुध्दा करण्यात येत होती. त्यामुळे या विषयीच्या तक्रारी फार पूर्वीपासून पोलिसांकडून करण्यात येत होत्या. त्याची दखल घेत पोलीस दलात प्रत्येकाच्या डोक्यावर घट्ट बसणारी व बदलत्या काळानुसार आवश्यक अशा कॅपचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे आज कायदा आणि सुव्यवस्थेच्या दैनंदिन कामाच्या तसेच बंदोबस्ताच्या धावपळीतही कॅप डोक्यावर घट्ट बसते. कॅपमुळे उन्हापासून चेहर्‍याचेही संरक्षण होत आहे. सध्या ही बेस बॉल टोपी पोलीस कॉन्स्टेबल ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलिसांना ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आकर्षक आणि स्वस्त

- Advertisement -

ही आधुनिक कॅप निळ्या रंगाची आहे. त्यावर एका बाजूला मराठीत तर दुसर्‍या बाजूला इंग्रजीमध्ये ‘रेल्वे पोलीस’ असे लिहिण्यात आले आहे. दर्शनी बाजूला महाराष्ट्र पोलिसांचा लोगो पिवळ्या रंगात आहे. कॅपच्या पुढील भागात लाल पट्टा असल्याने ही रंगसंगती आकर्षक दिसते. जुन्या एका टोपीची किंमत 110 रुपये आहे तर नव्या आणि आधुनिक बेस बॉल टोपीची किंमत फक्त 75 रुपये आहेत. त्यामुळे या टोपीला लोहमार्ग पोलिसांनी पसंती दिली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -