घरक्राइमSnakes Smuggling : सापांची तस्करी करणाऱ्या एकाला मुंबई विमानतळावर अटक, DRI ची...

Snakes Smuggling : सापांची तस्करी करणाऱ्या एकाला मुंबई विमानतळावर अटक, DRI ची कारवाई

Subscribe

DRIने मुंबई विमानतळावर सापांची आणि अजगरांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. या तस्कराकडून नऊ अजगर, दोन साप जप्त करण्यात आले असून आरोपीविरोधात सीमाशुल्क व वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचलनालय अर्थात DRI कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. DRIने मुंबई विमानतळावर सापांची आणि अजगरांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. या तस्कराकडून नऊ अजगर, दोन साप जप्त करण्यात आले असून आरोपीविरोधात सीमाशुल्क व वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संशयीत आरोपी वन्यजीवांची तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर गुप्तवार्ता विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. (snake smuggler arrested at Mumbai airport, DRI action)

हेही वाचा – व्हेल माशाची 3 कोटीची उलटी विक्रीसाठी आणली

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला एक व्यक्ती सापांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित व्यक्तीकडील एका पाकीटाची तपासणी केली असता, त्यांना त्यात पायथन रेगियस जातीचे 9 अजगर आणि पॅन्थेरोफिस गट्टाटस जातीचे 2 साप सापडले. त्यानंतर पोलिसांनी सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत ते जप्त केले. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जप्त केलेल्या साप व अजगरची माहिती घेतली असता ते परदेशातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सापांची तस्करी करताना आरोपीने आयात धोरणाचे उल्लघंन केल्याचे उघड झाले आहे. हे साप परदेशातील असल्याने हे 9 अजगर आणि 2 साप पुन्हा परदेशात पाठविण्यात येणार आहेत. हे वन्यजीव प्राणी विमान कंपनीच्या ताब्यात देण्यात आले असून विमान कंपनीच्या मदतीने पुन्हा बँकॉकला पाठवण्यात येणार आहेत. याप्रकरणी प्राणी घेऊन आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -