घरठाणेव्हेल माशाची 3 कोटीची उलटी विक्रीसाठी आणली

व्हेल माशाची 3 कोटीची उलटी विक्रीसाठी आणली

Subscribe

दोघांना अटक

ठाण्यात श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 3 कोटी रुपयांच्या व्हेल माशाच्या उलटी (वांती) ची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे स.पो.नि.शिवराज बेंद्रे याना मिळालेल्या माहितीनुसार ठाण्याच्या गोपाळ आश्रम समोरील रोड नं 16 ठाणे येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे सॅकमध्ये असलेली 3 कोटीच्या किमतीची उलटी हस्तगत करण्यात आली. दोघांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

श्रीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे याना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन इसम हे गोपाळ आश्रम समोरील रोड नं 16 ठाणे येथे येणार असलायची माहिती मिळाली. दरम्यान श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बेंद्रे, सहाय्यक सपोनि इंगळे, महिला पो.हा. नयना बनसोडे, पोलीस नाईक मुकीद राठोड,धोंडे आणि पोलीस शिपाई साळुंखे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. याच्या विचारपूस केल्यानंतर यात मुझमिल मझर सुभेदार(45) रा. मु.पो. श्रीवर्धन गोली मोहल्ला, ता-श्रीवर्धन, जिल्हा-रायगड आणि शहजाद शब्बीर कादरी (46) हा चालक असून रा. मु.पो. वरवंटना ता-म्हसळा, जि -रायगड असलयाचे चौकशीत समोर आले. त्यांच्याकडे असलेल्या सॅकमधील पिवळ्या पिशवीतील गुंडाळलेली व्हेल माशाची उलटी तपकिरी रंगाची असल्याचे आढळले. याची बाजारात 3 कोटी रुपये किंमत असल्याची माहिती वपोनि किरणकुमार कबाडी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -