घरमुंबईभीषण! कांदिवलीत दारूसाठी जन्मदात्या पित्यालाच भोसकून मारलं ठार!

भीषण! कांदिवलीत दारूसाठी जन्मदात्या पित्यालाच भोसकून मारलं ठार!

Subscribe

मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये दारूसाठी जन्मदात्या पित्यालाच एका मुलानं भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

माणूस दिवसेंदिवस संवेदनाहीन बनत चालला आहे की काय? अशी शंका यावी अशा अनेक घटना आपल्या आसपास घडत असताना आपण पाहातो, ऐकतो. तशीच एक धक्कादायक घटना मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये घडली आहे. इथे एका मुलानं दारूच्या व्यसनासाठी चक्क आपल्या जन्मदात्या पित्यालाच चाकूनं भोसकून ठार मारल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. ही बाब उघड झाल्यानंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून मृत बापाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

वडिलांची मजुरी, पण मुलगा दारूच्या आहारी

अशोक हवालदार सिंह हे ५० वर्षीय गृहस्थ कांदिवलीतल्या गोकुळनगर परिसरात असलेल्या लवकुश चाळीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहात होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची म्हणून ते स्वत: पन्नाशी गाठली असून देखील मोलमजुरी करून कुटुंबाचं पोट भरत होते. पण त्यांचा मुलगा रवी अशोक सिंह याला दारूचं भयंकर व्यसन जडलं होतं. स्वत: काम करून घराची जबाबदारी सांभाळण्यात वडिलांना मदत करण्याऐवजी रवी मात्र दारूच्या नशेत धुंद राहात असे. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला वारंवार दारूचं व्यसन सोडायला लावण्याचा प्रयत्न केला. अनेकदा यावरून त्यांचे खटके उडत. मुलाने दारूच्या आहारी न जाता काहीतरी कामधंदा करून घरखर्चात हातभार लावावा अशी रास्त अपेक्षा अशोक सिंह यांची होती. पण त्यांच्या मुलाला दारूशिवाय दुसरं काहीही सुचत नव्हतं.

- Advertisement -

हेही वाचा – पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून कोळीवाड्यात पतीची आत्महत्या

नशेत धुंद मुलानं बापाला भोसकलं

अशातच रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास रवी दारूच्या नशेमध्ये धुंद होऊन घरी परतला. त्यावर अशोक सिंह यांनी त्याला चार शब्द सुनावले. त्यातच त्यांच्यात वाद वाढला. दारूच्या नशेत आपण काय करतोय, याचं भानच नसलेल्या रवीनं थेट वडिलांवरच चाकूनं हल्ला केला. त्याने त्यांना चाकूनं भोसकलं. या हल्ल्यात अशोक सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्यात त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -