घरमुंबईबाइक नंतर लवकरच मुंबईकरांसाठी सायकल रुग्णवाहिका

बाइक नंतर लवकरच मुंबईकरांसाठी सायकल रुग्णवाहिका

Subscribe

बाइक रूग्णवाहिका च्या यशानंतर लवकरच मुंबईच्या अंधेरी, विलेपार्ले आणि शिवाजी पार्क परिसरात २० सायकल रूग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन त्या साठी मान्यता देखील मिळाली आहे.

मुंबईकरांसाठी लवकरच सायकल रूग्णवाहिका दाखल होणार आहे. मुंबईच्या अंधेरी, विलेपार्ले आणि शिवाजी पार्क परिसरात या २० सायकल रूग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या बाइक रूग्णवाहिकेच्या यशस्वी प्रयोगानंतर सायकल रूग्णवाहिका ही संकल्पना पुढे आली आणि आता आरोग्य विभाकडून देखील या संकल्पनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सायकल रुग्णवाहिकेचे फायदे

मुंबईच्या दाटीवाटीच्या परिसरात रूग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी सायकल रूग्णवाहिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. गर्दी आणि ट्राफिक मधून मार्ग काढत लवकरात लवकर रूग्णापर्यंत पोहोचणे  यामुळे शक्य होणार आहे. सायकल रूग्णवाहिकेवर असणाऱ्या व्यक्तीचा मोबईल नंबर हा १०८ या वैद्यकिय हेल्पलाइनशी जोडलेला असणार आहे. ज्यामुळे आलेल्या फोन कॉल्स नुसार संबधिंत रूग्णापर्यंत पोहोचता येणार आहे.

- Advertisement -

काय सुविधा असतील.

सायकल रूग्णवाहिकेला  एक पेटी बसवण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रथमोपचाराच्या दृष्टीने आवश्यक असणारे स्टेथोस्कोप, रक्तदाब तपासणी उपकरण, तापमापक, सिरिंज, कॉटन, बॅंडेड, ग्लुकोमीटर त्याचप्रमाणे वृद्धांसाठी आवश्यक असणारी औषधे यात असणार आहेत.

योजने साठीचा वार्षिक खर्च

संबधित योजना निरंतर सुव्यवस्थित चालवण्यासाठी, देखभालीसाठी वर्षाकाठी ३३ लाखापर्यंतचा खर्च येणार आहे. सदर सायकल चालवण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्याचे  वेतन, जीपीएस यंत्रणा, तसेच सायकलची दुरूस्ती, वैद्याकीय उपकरणे या गोष्टींवर होणाऱ्या खर्चाचा त्यात समावेश असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -