घरCORONA UPDATEJEE, NEET च्या विद्यार्थ्यांसाठी ५८ विशेष लोकल फेर्‍या

JEE, NEET च्या विद्यार्थ्यांसाठी ५८ विशेष लोकल फेर्‍या

Subscribe

मुंबई उपनगरातील JEE आणि NEETच्या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने जेईई आणि नीट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून १ ते ६ सप्टेंबर या दरम्यान विद्यार्थांसाठी प्रत्येक दिवशी ५८ विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थांना मोठा फायदा होणार आहे.

जेईई परिक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील २ लाख २० हजाराहून जास्त विद्यार्थांनी नोंदणी केली आहे. यातील सर्वात जास्त विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. त्यामुळे परिक्षा केंद्रांवर जाण्यासाठी विद्यार्थांना त्यांच्या परिक्षा प्रवेश पत्रावर उपनगरी लोकल सेवेत प्रवेश द्यावा अशी मागणी आमदार आशिष शेला यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला होता. त्याला सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्य दिली आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेने विद्यार्थांसाठी सकाळी आणि सांयकाळी अतिरिक्त लोकल सेवा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने एकूण १२ तर पश्चिम रेल्वेने ४६ अशा एकूण ५८ विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर सकाळी कल्यान-सीएसएमटी, कळवा- सीएसएमटी, तर हार्बर मार्गांवर पनवेल- सीएसएमटी आणि वाशी ते सीएसएमटी अशा पहाटे पासून लोकल सेवा धावणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवरसुध्दा नालासोपार- चर्चगेट, विरार- चर्चगेट, बोईसर-महालक्ष्मी, विरार- बोरीवली आणि दादर – विरार अशा विशेष लोकल सेवा धावणार आहेत.

- Advertisement -

अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू

जेईई आणि नीट परीक्षा देणार्‍या उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या दिवशी पालकांसह उपनगरी स्थानकांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असेल. स्थानकांवरील स्टेशन आणि सुरक्षा अधिकार्‍यांना परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी यासाठी योग्य त्या सूचना रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. त्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -