घरमुंबईमंत्रिमंडळात आयारामांना संधी

मंत्रिमंडळात आयारामांना संधी

Subscribe

एकनाथ खडसे यांचा घरचा अहेर

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. विस्तारात ज्यांचा सहभाग करण्यात आलाय त्यात सगळेच आयाराम असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. पक्षासाठी अनेकवर्षं खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्यांच्या हाताला मंत्रिपद देण्याऐवजी इतर पक्षांमधून येणार्‍यांच्या दावणीला पक्षाला बांधलं जात असल्याचं खडसे म्हणाले.

रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला १०, शिवसेनेला २ आणि रिपाईला १ मंत्रिपद देण्यात आलं आहे. आयारामांच्या या पदभरतीवर खडसे यांनी जोरदार प्रहार केला आहे. राधाकृष्ण विखेपाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर त्यांचे नाव न घेता खडसे यांनी जोरदार टीका केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडसे यांनी मंत्रिमंडळातून दूर करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत त्यांना क्लिनचिट देण्यात आले होते. त्यांच्यावरील आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निकालात निघाल्याच्या पार्श्वभूमीवर खडसे यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिले जाईल, असे वाटत असताना त्यांच्या नावाची साधी चर्चाही शपथविधीवेळी नव्हती.

- Advertisement -

मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याप्रकरणी खडसे यांनी उघड नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले; मंत्रिमंडळात जायसेच आता आपल्याला वाटत नाही. तसा उत्साहही आता राहिलेला नाही. पण ज्यांना या विस्तारात स्थान दिले आहे, त्यातले बरेचजण काँग्रेस पक्षांतून आले आहेत, असा आक्षेप खडसे यांनी घेतला. पक्षाने आयात नेत्यांना मंत्रिपदी संधी दिली आहे. मात्र पक्ष वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या नेत्यांना पध्दतशीरपणे डावलण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला.अनेक नेते चार-पाच वेळा निवडून आलेले आहेत. तरीसुद्धा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही, असा शेराही त्यांनी या निमित्त मारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -