घरमुंबईएसटीला दोन वाहकांचा गंडा

एसटीला दोन वाहकांचा गंडा

Subscribe

दक्षता विभागाच्या तपासणीनंतर धडक कारवाई

राज्य परिवहन महामंडळा (एसटी)च्या दक्षता विभागाने नुकतेच एका एसटी बसची तपासणी केली, तेव्हा त्यातील वाहकाने एकूण प्रवाशांना पैकी अर्ध्या प्रवाशांना पैसे घेऊन तिकिट दिलेच नसल्याची माहिती समोर आली. तर कोरेगांव आगारातील एक वाहक केवळ २ फेर्‍या मारून घरी जात असल्याचे दक्षता विभागाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी दक्षता विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात आली. वाहक मेहश मिश्रा आणि अमोल तानाजी बरगे अशा या दोन वाहकांचे नाव आहे.

महाराष्ट्राची लोकवाहिनी आणि ग्रामीण भागाची लालपरी अर्थात एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे. मात्र तरीसुद्धा वाहकांकडून अपहाराची मालिका सतत सुरूच आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणांना आळा बसावा म्हणून एसटीकडून वर्षभरापूर्वी दंडात वाढही करण्यात आली. परंतु त्यानंतरही गैरव्यवहारांना आळा बसलेला नाही. आता तर चक्क एसटीच्या मार्ग तपासणी पथकांची आणि वाहकांचे लागेबंध असल्यामुळे दक्षता विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नुकतेच पुसद-कुंभारी मार्गावर वाहकांची तपासणी केली असता. वाहक मेहश मिश्रा यांनी पैसे तिकीट न दिल्याचे समोर आले, तर सातारा जिल्ह्यातील एसटीच्या कोरेगाव आगरातील अमोल तानाजी बरगे या वाहकावर कारवाई केली. हा वाहक फक्त ११० किलोमीटर एसटीची एक फेरी मारून घरी परत जायच्या. त्यामुळे प्रत्येक दिवशी हजारो रुपयांचे एसटीचे नुकसान होत होते, अशी माहिती एसटी एसटी महामंडळाच्या दक्षता विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर देण्यात आली आहे.

- Advertisement -

एका वर्षात ३५ हजार प्रकरणे

भाडे वसूल करून तिकीट न देणे, वाहकाकडे तिकिटांच्या तुलनेत कमी किंवा जास्त पैसे असणे, प्रवाशांना तिकीट न देणे, सुटे पैसे परत न करणे, चालकांनी थांबा सोडून इतरत्र गाडी थांबविणे, बेकायदा पार्सलची वाहतूक करणे अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळाने एका वर्षात एसटीचे विविध मार्ग तपासणी करून ३५ हजार प्रकरणे दाखल करून घेतली आहेत. अनेक एसटीच्या वाहकांवर प्रवासादरम्यान चुकीचे प्रकार केल्याचे ३० पेक्षा जास्त प्रकरणे दाखल केल्याचे उघड झाले आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -