घरमुंबईचतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन स्थगित

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन स्थगित

Subscribe

विविध मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातील हॉस्पिटल्समधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

मुंबईसह महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल्समधील तब्बल ५० हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. पण, वेगवेगळ्या मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाला संध्याकाळी ४च्या सुमारास स्थगिती देण्यात आली. शिवाय, दोन महिन्यात या मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असा विश्वास कर्मचाऱ्यांना दिला गेला.

विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सरकार आणि हॉस्पिटल प्रशासनाने बदली कर्मचाऱ्यांना आणि त्यासोबत गेली अनेक वर्ष सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या कामगारांना कायमस्वरुपी कामावर रुजू करुन घ्यावं, अनेक रिक्त जागांवर नियुक्ती करावी. अनुकंपा, वारसा हक्त देऊन रिक्त पदांवर कामावर ठेवावं या प्रमुख मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी केली अनेक वर्ष आंदोलनं, संप करत आहेत. सोबतच, हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या खासगीकरणाविरोधात सरकारी हॉस्पिटल्समधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलन करत होते.

- Advertisement -

मागण्या पूर्ण होण्याचं आश्वासन

मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सह्या करुन आंदोलनासाठी उतरले. पण, एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नव्हता. जे.जे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी जे.जे परिसरातच आंदोलन केले. त्यानंतर दुपारी आरोग्य सचिव संजय मुखर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या मागण्या ऐकून त्यावर पुढच्या दोन महिन्यात तोडगा काढला जाईल असं आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.

आरोग्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मागण्या मान्य करुन लवकरच तोडगा काढू असं आश्वासन दिले आहे. दोन महिन्यांमध्ये रिक्त पदांची ५० टक्के भरती केली जाईल. शासकीय नियमाप्रमाणे खासगीकरण रद्द केले जाईल. तीन महिन्यांत बदली कामगारांपैकी ७३४ कर्मचाऱ्यांना टर्मिनेट केलं जाईल. शिवाय, अनुकंपा, वारसा हक्कानुसार पदं भरली जातील असं आश्वासन देण्यात आलं आहे. यावियी पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -