घरमुंबईजैन सोसायटीतील वृद्घांना लक्ष्य करणार्‍या सोनसाखळी चोराला अटक

जैन सोसायटीतील वृद्घांना लक्ष्य करणार्‍या सोनसाखळी चोराला अटक

Subscribe

सायन माटुंगा परिसरातील जैन सोसायटी मधील वृद्धांना लक्ष करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणार्‍या एका सराईत सोनसाखळी चोराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिवा रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अटक केली आहे. एका 83 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची निवासी इमारतीच्या जिन्यावरुन जाताना मागून येऊन सोनसाखळी चोरी करुन पळून गेलेला हा चोर रेकॉर्डवरील आरोपी आहे. भरत नवलसिंग करमी असे या 40 वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सायन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांनी सांगितले.

इच्छाबेन अमुलख व्होरा ही वयोवृद्ध महिला शीव येथील रोड क्रमांक आठ, जैन सोसायटीमध्ये राहते. त्या दिवसातून तीन ते चार वेळा त्याच परिसरातील अभिनंदन स्वामी जैन मंदिरात जातात. 9 नोव्हेंबरला त्या जैन मंदिरातून सायंकाळी पावणेपाच वाजता घरी जात होत्या. यावेळी जैन सोसायटीच्या जिन्यावरुन जाताना अचानक मागून एक तरुण आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चैन खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी चैन पकडून ठेवली. यावेळी त्याने त्यांच्या खांद्याला जड वस्तूने मारहाण करुन ही चैन घेऊन तेथून पलायन केले होते.

- Advertisement -

आरोपी सीसीटिव्हीत कैद
हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर तो आरोपी भरत करमी असल्याचे उघडकीस आले. या सोनसाखळी चोरला अटक करण्यासाठी सायन पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथक त्याच्या मागावर होते. दरम्यान हा सोनसाखळी चोर दररोज दिवा रेल्वे स्थानकातून सीएसटी कडे येणारी पहिली ट्रेन पकडून मुंबई येत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवळे याना मिळाली. या माहितीच्या आधारे रेवळे यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून त्याकामी लावले. गुरुवारी पहाटे गुन्हे शाखेचे पथक दिवा रेल्वे स्थानकात दबा धरून बसले असताना भरत नवलचंद कुरमी हा सोनसाखळी चोर दिवा स्थानकात आला व असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली.

५० पेक्षा जास्त गुन्हे
भरत याच्यावर सायन, माटुंगा, अँटॉप हिल आदी परिसरात ५० पेक्षा अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे आहेत. भरत हा पूर्वी सायन परिसरात राहण्यास होता. सध्या तो कळवा येथे राहण्यास आहे. पहाटेच्या सुमारास सायन,माटुंगा आदी परिसरातील जैन सोसायटीमधील वृद्धांना आपले लक्ष बनवून त्यांना लुटत होता, अशी माहिती त्याच्या चौकशीत समोर येत आहे. त्याच्या या प्रकारच्या गुन्ह्याच्या पद्धतीमुळे अनेक वृद्ध महिला जखमी झालेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -