घरमुंबईशत्रूशी दोन हात करणारा यंत्रमानव, विद्यार्थ्यांनी लावला शोध

शत्रूशी दोन हात करणारा यंत्रमानव, विद्यार्थ्यांनी लावला शोध

Subscribe

मुंबईमध्ये आयआयटीतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 'ई-यंत्रा' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नवी मुंबई येथील नेरूळमधील रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक समस्या सोडवण्यासाठी एक संशोधन सादर करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये आयआयटीतर्फे दरवर्षी प्रमाणे यार्वर्षीही ‘ई-यंत्रा’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांकडून सामाजिक समस्या सोडवण्याच्या संबंधीत एक संशोधन सादर करण्यात आले आहे. भारतीय सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरघोड्या या चालूच असतात. शत्रू सैनिक शस्त्रसंधीचे उल्लघंन करतच असतात. मात्र, त्या चकमकीत, शस्त्रसंधी उल्लंघनेत अनेक जवान सीमारेषेवर शहीद होत असतात. बऱ्याचदा शत्रूच्या सैनिकांची माहिती मिळाली नसल्याने लष्कर अडचणी येतात. यामुळे भारतीय जवानांच्या शहिदांची संख्या कमी करण्यासाठी आणि लष्कराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवी मुंबई येथील नेरूळमधील रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक संशोधन केले आहे. या संशोधनात विद्यार्थ्यांनी एक यंत्रमानव तयार केले असता, हा यंत्रमानव जंगलात किंवा सीमारेषेवर लपून बसलेल्या दहशतवाद्यांची किंवा शत्रू सैनिकांची माहिती मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

यंत्रमानव नेमके काय करू शकतो?

भारतीय लष्करांना मदत करण्यासाठी या यंत्रमानवाचे संशोधन करण्यात आले आहे. हा यंत्रमानव खडतर मार्गा सहज पार करू शकतो. तसेच संपूर्णपणे स्वयंचलित हा यंत्रमानव असणार आहे. तर तो शत्रूशी लढू शकतो, त्यांच्यावर हल्लाही करू शकतो. तसेच त्याच्यावर उपग्रहामार्फत लक्ष्य ठेवता येऊ शकणार आहे. तसेच या यंत्रमानवात कॉमेरे बसवण्यात आल्याने शत्रूंची संख्या किती आहे, त्यांच्याकडे कोणते हत्यार आहेत, यासर्व गोष्टींची माहिती लष्कारांना मिळू शकते. तसेच यंत्रमानवाला उपग्रहामार्फत कोणत्या प्रकारची कारवाई करायची आहे, याची सूचनाही यंत्रमानवाला देता येऊ शकणार आहेत. तसेच माणूस जिथे जाऊ शकत नाही त्या ठिकाणी तो पोहचू शकतो, अशा प्रकारच्या यंत्रमानवाचे सादरीकरण करण्यात आले आहे. ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या स्नेहल बोंदरे, मोहितोश चौधरी, जागृत जाधव आणि राहुल चंडक यांनी हा यंत्रमानव बनवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -