घरक्रीडामुंबई मॅरेथॉनमध्ये सुधा सिंगची हॅटट्रिक

मुंबई मॅरेथॉनमध्ये सुधा सिंगची हॅटट्रिक

Subscribe

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एलिट भारतीय महिलाच्या गटातून तिसऱ्यांदा भारतीय ऑलिम्पिक खेळाडू सुधा सिंग हिने प्रथम क्रमाकांच स्थान पटाकावलं आहे. यावर्षी तिने हॅटट्रिक केली आहे. सुधा सिंग या ३३ वर्षीय स्टीपलचेस रेकॉर्डरने टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये २०१८ आणि २०१९ मध्ये विजय प्राप्त केला होता. २०१९ मध्ये तिने २ तास ३४ मिनिटं ५६ सेकंद या सर्वोत्तम वेळेत तिने कामगिरी केली. फ्री प्रेसच्या वृत्तानुसार, यावर्षी तिला मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागला. गतवर्षीच्या तुलनेत तिने यावर्षी १० मिनिटं जास्त वेळं घेतला आहे. याशिवाय मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआच्या धावपटूंने म्हणजेच डेरारा हरीसा विजेता ठरला आहे. इथिओपिआच्या डेरारा हरीसाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

- Advertisement -

गतवर्षीचा रेकार्ड तोडण्याचा प्रयत्न करणार नसल्याचं तिने फ्री प्रेस संकेत स्थळाला सांगितलं होत. तिला फक्त हटट्रिक पूर्ण करण्याची इच्छा होती. २०१७ मध्ये दुखापत झाल्या कारणाने तिला विश्रांती करण्याची गरज होती. दुखापत सावरल्यानंतर तिने प्रशिक्षक बिजेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पटियाला राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षण घेतलं. तिचा या विजयाचा फायदा तिला आगामी क्रीडा स्पर्धेसाठी होणार आहे.


हेही वाचा – मुंबई मॅरेथॉनला गालबोट; ६४ वर्षीय इसमाचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -