घरमुंबईमहालक्ष्मी रेसकोर्स येथील NSCI मध्ये सब कत्रांटदाराची आत्महत्या

महालक्ष्मी रेसकोर्स येथील NSCI मध्ये सब कत्रांटदाराची आत्महत्या

Subscribe

आर्थिक तंगी आणि कर्जबाजारी झाल्यामुळे राजेश तावडे यांची गळफास लावून आत्महत्या

महालक्ष्मी रेसकोर्स येथील NSCI (National Sports Club of India) येथे एका सब कत्रांटदाराने रविवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, या कत्रांटदाराचे नाव राजेश तावडे असे आहे. राजेश तावडे विक्रोळी येथे राहण्यास असून त्याचे NSCI क्लबमध्ये कंत्राट सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून या कंत्राटदारांनी पेमेंट रोखून धरला होता. त्यामुळे आर्थिक तंगी आणि कर्जबाजारी झाल्यामुळे राजेश तावडे या सब कंत्राटदाराने NSCI क्लबच्या आतच रविवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान, मृत्यूपूर्वी राजेश तावडे याने लिहलेल्या चिठ्ठीत अनेकांची नावे असून ताडदेव पोलिसांनी अपमृत्यु दाखल केला आहे. या चिठ्ठीत असलेली नावे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -