घरमुंबईसावंत कुटुंबीयांमुळे मिळणार दोन अंधाना दृष्टी

सावंत कुटुंबीयांमुळे मिळणार दोन अंधाना दृष्टी

Subscribe

सुनिल सावंत (४५) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. कुटुंबियांनी नेत्रदान करण्याचा घेतला निर्णय. निर्णयाचे सगळीकडून कौतुक. नेत्रदानामुळे मिळणार दोन अंध व्यक्तींना दृष्टी.

पवईतील महात्मा फुले नगरमध्ये राहणारे सुनिल मनोहर सावंत (४५) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु, या शोकाकुळ परिस्थितही सावंत कुटुंबियांनी सुनिल सावंत यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या निर्णयांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. त्यांना जगाचे वास्तवीक रुप आता फक्त अनुभवताच नाही तर बघायलाही मिळणार आहे.

सायन रुग्णालयात उपचार सुरु होते

सुनिल सावंत पवईतील फूले नगरात आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी राहत होते. रोजंदारीवर पेंटिंगचं काम करणारे सुनिल यांना मागील आठवड्यात लकवा गेला होता. त्यानंतर त्यांच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू होते. दिवसेंदिवस प्रकृती खालवल्याने सुनिल यांनी उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं. आणि त्यांचे शनिवारी उपचारादरम्यान निधन झालं. निधनाची बातमी कळल्यानंतर सुनिल यांचा मुलगा आणि पत्नी यांनी त्यांचे डोळे गरजूंना दान करायचे, असं ठरवलं. त्यामुळे तात्काळ निर्णय घेत त्यांनी त्यांचे नेत्रदान केले.

- Advertisement -

वडील नेत्ररुपाने निरंतर जीवंत राहतील – विशाल सावंत

सध्या अवयव दानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, सावंत कुंटुंबीयांच्या नेत्रदानाच्या निर्णयाने दोन अंध व्यक्तींना याचा फायदा होईल. त्यामुळे सर्वत्र या निर्णयामुळे सावंत कुटुंबाचे कौतुक होत आहे. “वडीलांच्या निधनानंतर आम्ही पोरके झालो आहोत. मात्र माझे वडील नेत्ररुपाने निरंतर जीवंत राहतील, या एकमेव उदिष्टाने आम्ही कुटुंबियांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला असल्याचे सुनिल यांचा मुलगा विशाल सावंत याने सांगितले. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -