घरमुंबईशस्त्रक्रियेमुळे नवजात अर्भकातील व्यंग दूर

शस्त्रक्रियेमुळे नवजात अर्भकातील व्यंग दूर

Subscribe

बाळ जन्मल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याला जीवदान दिले.

आईच्या पोटात असतानाच बाळाच्या पोटातील आतड्यांमध्ये अडथळा असल्याने त्याला डुओडेनल अ‍ॅट्रेसिया प्रकारचा आजार झाल्याचे लक्षात आले. फारच विरळ असणार्‍या या आजारामुळे बाळामध्ये व्यंग निर्माण होण्याचा किंवा ते दगावण्याचा धोका अधिक असतो. मात्र बाळ जन्मल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याला जीवदान दिले. हाजीअली येथील एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.

भायखळ्यातील शहनाज (३४) या गर्भवती महिलेला ३२ आठवड्यांच्या नियमित तपासणीदरम्यान बाळाच्या आतड्यांमध्ये अडथळा असल्याचे समजले. या आजाराला डुओडेनल अ‍ॅट्रेसिया असे म्हणतात. या आजारात आतड्यांच्या सुरुवातीचा भाग तयार होत नाही. त्यामुळे तांत्रिक अडथळा येऊन दूध व पाचक द्रव्य पदार्थ पुढे जात नाहीत. अशावेळी बालकांमध्ये व्यंग निर्माण होण्याचा अथवा दगावण्याचा धोका असतो. त्यामुळे गर्भवती महिलेला दोन महिने रुग्णालयातच दाखल करून घेत तिच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर अवघ्या २४ तासांतच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. डॉक्टरांनी बाळाच्या ओटीपोटावर लॅप्रोस्कोपीक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रकिया केली. या शस्त्रक्रियेनंतर पाच दिवसांनी मोठ्या आतड्यातून लहान आतड्यांमध्ये दुधाचा प्रवाह चांगल्या प्रकारे होत असल्याचे दिसून आले. बाळाची पचनसंस्था सुरळीत सुरू झाली होती. त्यामुळे बाळाला तोंडावाटे आहार देण्यास सुरुवात केली.
११ व्या दिवशी त्याला पूर्ण आहार सुरू करून घरी सोडण्यात आले, अशी माहिती हाजीअली येथील एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलचे बालरोग शस्त्रक्रिया जेष्ठ तज्ज्ञ डॉ. रसिक शहा यांनी दिली. या शल्यचिकित्सेसाठी डॉ. रसिक शहा यांच्याबरोबर बालरोग शस्त्रक्रिया वरिष्ठ सल्लागार डॉ. रवी रामद्वार, पेडियाट्रिक अ‍ॅनेस्थेसिया प्रमुख व सल्लागार डॉ. नंदिनी दवे, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनित समदानी या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -