घरताज्या घडामोडीमहापालिका देणार पोहण्याचे प्रशिक्षण; नवीन जलतरणपटू घडविणार

महापालिका देणार पोहण्याचे प्रशिक्षण; नवीन जलतरणपटू घडविणार

Subscribe

मुंबईकरांना क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, नवीन जलतरणपटू घडावेत या उद्देशाने मुंबई महापालिका आपल्या सहा तरण तलावात इच्छुकांना २ मे पासून दोन टप्प्यात २१ दिवसांचे पोहण्याचे प्रशिक्षण देणार आहे.

मुंबई : मुंबईकरांना क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, नवीन जलतरणपटू घडावेत या उद्देशाने मुंबई महापालिका आपल्या सहा तरण तलावात इच्छुकांना २ मे पासून दोन टप्प्यात २१ दिवसांचे पोहण्याचे प्रशिक्षण देणार आहे. १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना फक्त २ हजार रुपयांत तर त्या पुढील वयोगटासाठी फक्त ३ हजार रुपये एवढ्या माफक शुल्कात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना उत्तम जल तरणपटू होण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे.

पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पालिकेकडून नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंक २५ मे पासून कार्यान्वित होणार आहे. यासाठीची नोंदणी ‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्रवेश’ या पद्धतीने दिली जाणार असल्याने इच्छुकांनी आपला प्रवेश शक्य तेवढ्या लवकर घ्यावा, अशी माहिती उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.

- Advertisement -

माफक दरात प्रशिक्षण

मुंबईत विविध खाजगी संस्थांद्वारे १५ दिवसांच्या जलतरण प्रशिक्षण देण्यासाठी ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. मात्र अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार, २१ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी (२ ते २३ मे आणि २३ मे ते १२ जून या कालावधीत आणि दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० या वेळेत) पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांकरिता २ हजार रुपये तर त्या पुढील वयोगटासाठी ३ हजार रुपये एवढया माफक शुल्कात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

- Advertisement -

पालिकेच्या ६ जलतरण तलावात साधारणपणे ६ हजार प्रशिक्षणार्थींना नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली आहे.


हेही वाचा – ‘मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतोय’, घर सोडताना राहुल गांधी भावूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -