घरमुंबईमुंबईत स्वाईन फ्ल्यू व मलेरिया रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृत्यू शून्य

मुंबईत स्वाईन फ्ल्यू व मलेरिया रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृत्यू शून्य

Subscribe

जून २०२२ मध्ये गॅस्ट्रोच्या ५४३ रुग्णांची तर कावीळच्या ६४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती

मुंबईसह महाराष्ट्रात व दिल्लीपर्यंत ‘राजकारण’ तापले असताना मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्या वाढीचा ‘ताप’ वाढला आहे. सुदैवाने साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत जरी वाढ होत असली तरी अद्याप एकही रुग्ण दगावलेला नाही. मात्र पालिका आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

पालिका आरोग्य खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबईत गेल्या जून महिन्याच्या तुलनेत जुलै अखेरपर्यंत साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास येते. जून महिन्यात स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णांची संख्या २, मलेरिया रुग्ण संख्या ३५०,लेप्टो रुग्ण संख्या -१२, डेंग्यू रुग्ण संख्या ३९ , गॅस्ट्रो रुग्ण संख्या – ५४३, कावीळ रुग्ण संख्या – ६४, चिकुनगुणीया रुग्ण संख्या – १ असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

मात्र १ ते २४ जुलै या कालावधीत साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची नोंद तपासल्यास स्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या ६२ एवढी नोंदविल्याने अर्थातच स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णांच्या संख्येत तब्बल ६० ने वाढ झाल्याचे दिसून येते. त्यापाठोपाठ मलेरिया रुग्णांची संख्या ३९७ एवढी नोंदविल्याने मलेरिया रुग्णसंख्येत -४७ ने वाढ झाली आहे. त्यानंतर लेप्टो रुग्ण संख्या ३४ एवढी नोंदविण्यात आल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात रुग्णसंख्येत – २२ ने वाढ झाली आहे. तसेच, डेंग्युने ग्रस्त रुग्णांची संख्या ५० एवढी आढळून आली असून डेंग्यूच्या रुग्ण संख्येतही ११ ने वाढ झाल्याचे निदर्शनास येते. मात्र चिकुनगुणीया रुग्ण संख्या जून व जुलैअखेरपर्यंत १ एवढी समान आढळून आली.

गॅस्ट्रो, कावीळ रुग्ण संख्येत घट

जून २०२२ मध्ये गॅस्ट्रोच्या ५४३ रुग्णांची तर कावीळच्या ६४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. याउलट जुलै अखेरपर्यंत गॅस्ट्रो ग्रस्त रुग्णांची संख्या ५२४ एवढी नोंदविण्यात आल्याने साहजिकच गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत १९ ने घट झाली आहे. तर कावीळ ग्रस्त रुग्णांची संख्या ५५ एवढी नोंदविण्यात आली असल्याने साहजिकच कावीळच्या रुग्णसंख्येत ९ ने घट झाल्याचे निदर्शनास येते. ही बाब पालिका प्रशासनासाठी समाधानकारक आहे.

- Advertisement -

साथीच्या आजारांबाबत तुलनात्मक आकडेवारी

आजार                 जून                जुलै                वाढ/ घट
२०२२              २०२२

स्वाईन फ्ल्यू            २                  ६२                  + ६०

मलेरिया               ३५०                ३९७                  + ४७

लेप्टो                    १२                 ३४                    + २२

डेंग्यू                    ३९                 ५०                    + ११

गॅस्ट्रो                   ५४३                ५२४                  – १९

कावीळ                ६४                  ५५                    – ९

चिकुनगुणीया           १                    १                       ०


पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत! मोदी सरकारचे राज्यसभेत सूचक संकेत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -