घरमुंबईआत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेखचा उपचारादरम्यान मृत्यू

आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेखचा उपचारादरम्यान मृत्यू

Subscribe

कर्जत येथील दर्ग्याच्या जागेतील अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या तौसिफ शेखचा २१ डिसेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अहमदनगरच्या कर्जत येथील दर्ग्याच्या जागेतील अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यासाठी काल, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या तौसिफ शेखचा आज, २१ डिसेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तौसिफने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, त्यांनतर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्जत येथील दर्ग्याच्या जागेतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तौसिफने आंदोलन केले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी न करण्याच्या निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ कर्जतमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची कर्जत येथील मुस्लिम समाजाची तयारी असून बंदच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

कर्जत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच तौसिफ शेख याने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पीर दावल मलिक ट्रस्टच्या जागेत झालेल्या अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे या मागणीसाठी तौसिफ शेख हे काही महिन्यांपासून मागणी करत आंदोलन करत होते. आश्वासन देऊनही पोलीस-प्रशासनाने दावल मलिक ट्रस्टच्या जागेतील अनधिकृत बांधकाम काढलं नसल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -