घरमुंबईरुग्णालयात आग; नवजात अर्भकाचा मृत्यू

रुग्णालयात आग; नवजात अर्भकाचा मृत्यू

Subscribe

अंधेरीतील कामगार हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीतील जखमींवर उपचार सुरु असतानाच या जखमींपैकी एका नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अंधेरी मधील मरोळ येथे कामगार रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेमध्ये एकूण १४७ लोक जखमी झाले होते. तर या घटनेमध्ये त्याच दिवशी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा आकडा वाढला असून कामगार रुग्णालयाच्या दुर्घटनेत आज अकरावा बळी गेला आहे. आज होली स्पिरीट रुग्णालयात एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. एका सात दिवसाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी आगीत जखमी झालेल्यांपैकी एका रुग्णाचा सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे ६५ वर्षीय दत्तू किसन नरवडे यांचा मृत्यू झाला होता.


वाचा – कामगार रुग्णालयात पुन्हा आग

- Advertisement -

तीन दिवसांत दोनदा आग

दरम्यान, बुधवारी रात्री अंधेरीतील कामगार रुग्णालयाला पुन्हा एकदा आग लागली होती. गेल्या तीन दिवसांत आगीची ही दुसरी घटना होती. कामगार रुग्णालयाच्या मीटर रुमला आग लागली असून यामुळे येथील स्थानिकांमध्ये पुन्हा भिती निर्माण झाली. मागील दोन दिवस या रुग्णालयाचा वीज पुरवठा बंद होता. बुधवारी संध्याकाळी तो सुरु करण्यात आला. वीज सुरु केल्यानंतरच येथील मीटर कक्षाला ही आग लागली असल्याचे समोर आले. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली. काही वेळेच्या प्रयत्नानंतर अखेर या आगेवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र काही तासांपूर्वीच आग लागलेल्या इमारतीला पुन्हा आग लागल्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.


वाचा – कामगार रुग्णालय आग प्रकरण; ४ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

- Advertisement -

मृतांच्या संख्येत वाढ

अंधेरीमधील मरोळ या ठिकाणी असलेल्या कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढत आहे. आता पर्यंत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


वाचा – अंधेरी कामगार हॉस्पिटल आग घटनेतील दहावा बळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -