घरताज्या घडामोडीमुंबईत टॅक्सी भाडेवाढ करा, टॅक्सीमेन्स युनियनची मागणी

मुंबईत टॅक्सी भाडेवाढ करा, टॅक्सीमेन्स युनियनची मागणी

Subscribe

देशात पेट्रोल-डिझेलसह सीएनजीच्या दरात मोठी दरवाढ होताना दिसत आहे. सततच्या सीएनजी दरवाढीमुळे टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. त्यावर अजून निर्णय झाला नाही, परंतु १ जूनपासून भाडेवाढ करणारच, असा इशारा टॅक्सी संघटनांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत सीएनजीचे दर ५१ रुपये ९८ पैशांवरून ७६ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे ५ रुपये भाडेवाढीची मागणी टॅक्सी संघटनांनी केली आहे.

सीएनजी आणि पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ परवडणारी नसल्याने टॅक्सी, रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. त्यानुसार भाडेवाढीची चाचपणी परिवहन विभागाने सुरू केली आहे. किमान 2 ते 3 रुपयांनी रिक्षाचे भाडे वाढवण्याचा विचार सुरू असून टॅक्सीचे भाडे दर अद्याप निश्चित झाले नाहीत. टॅक्सी संघटनांनी किमान ५ रुपये भाडेवाढीची मागणी केली आहे.

- Advertisement -

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. टॅक्सी संघटनांना भाडेवाढ द्या, अन्यथा १ जूनपासून आम्ही भाडेवाढ सुरू करू, अशा इशारा टॅक्सी संघटनांनी दिला आहे.

सीएनजीच्या दरात ३५ टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली असून त्यामुळे परिवहन विभागाकडे टॅक्सीच्या दरात किमान 5 रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. परिवहन विभागाकडून निर्णय घेण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त होत असून चालकांच्या खिशाला कात्री लागत आहे. -ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, टॅक्सीमेन्स युनियन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -