घरमुंबईअनुदान मिळालचं पाहिजे; शिक्षिकांचे 'मातोश्री'वर आंदोलन

अनुदान मिळालचं पाहिजे; शिक्षिकांचे ‘मातोश्री’वर आंदोलन

Subscribe

खाजगी प्राथमिक मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील मान्यताप्राप्त विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी ७३ शाळांमधील शिक्षक आंदोलनाला बसले आहेत. शाळेतील ५० ते ६० शिक्षिकांनी थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’बाहेर धडक देत आंदोलन केले आहे.

खाजगी प्राथमिक मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील मान्यताप्राप्त विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी २२ दिवसांपासून ७३ शाळांमधील शिक्षक आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनकरत्या शिक्षकांच्या मागणीकडे मुंबई महापालिका आयुक्तांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. सोमवारी शाळेतील ५० ते ६० शिक्षिकांनी थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’बाहेर धडक देत जोरदार आंदोलन केले आहे. शिक्षिकांच्या आंदोलनाची दखल घेत शिवसेना आमदार अनिल परब आणि शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

उद्धव ठाकरे भेटणार नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ७३ खासगी प्राथमिक विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी २२ दिवसांपासून बृहन्मुंबई महानगरपालिका खाजगी प्राथमिक शाळा वेतन अनुदान कृती समितीतर्फे आंदोलन पुकारण्यात आले आहे. पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिक्षकांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलन केले आहे. तसेच सभागृह नेत्यांनीही शाळांना अनुदान देण्याचा पवित्रा घेतला आहे. पालिका आयुक्तांकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिक्षकांच्या मागण्याबाबत आयुक्त गंभीर नसल्याने अखेर संतप्त झालेल्या शिक्षिकांनी सोमवारी सकाळी थेट ‘मातोश्री’वर धडक दिली. यावेळी उद्धव ठाकरे भेटणार नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा शिक्षिकांनी घेतला आहे. शिक्षिकांच्या आंदोलनाची दखल घेत शिवसेना आमदार अनिल परब आणि शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी मातोश्रीबाहेर त्यांची भेट घेतली. यावेळी पालिका मुख्यालयात मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

तर राजीनामा देईन

मुंबईतील ७३ शाळांना अनुदान न मिळाल्यास शिक्षण समिती अध्यक्ष पदाचा राजीनामा देईन, असे आश्वासन मंगेश सातमकर यांनी शिक्षकांना दिले. पण काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी निर्णय न घेतल्यास त्यांच्या दालनासमोर उपोषणला बसण्याचा इशारा त्यांनी स्थायी समितीत दिला होता. मात्र सातमकर यांनी उपोषण न केल्याने त्यांच्या आश्वासनाबाबत शिक्षकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे.


हेही वाचा – महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनाबाहेर शिक्षकांचे आंदोलन

- Advertisement -

हेही वाचा – शाळा वाचवण्यासाठी पालक, शिक्षकांचे आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -