घरताज्या घडामोडीसरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या भुमाफियांना तहसीलदारांची नोटीस

सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या भुमाफियांना तहसीलदारांची नोटीस

Subscribe

पडघा येथील पाच भुमाफियांना शासकीय जमीनीवर अतिक्रमण करून जमीन अनधिकृतपणे बिनशेती उपयोगात आणल्याने व अतिक्रमण करून सरकारी जमिन हडपण्याचा प्रयत्न केल्याने भिंवडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नोटीस बजावली आहे.

तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सर्वे नं. १०१/१ या सरकारी जमिनीवर भुमाफियांनी अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम केले आहे. भुमाफिया येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम करून एक रूम अडीच ते तीन लाख रुपयांना ग्राहकांना विकत असल्याचे समोर आले आहे. या विरोधात स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रारी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या अहवालानुसार पडघा येथील पाच भुमाफियांना शासकीय जमीनीवर अतिक्रमण करून जमीन अनधिकृतपणे बिनशेती उपयोगात आणल्याने व अतिक्रमण करून सरकारी जमिन हडपण्याचा प्रयत्न केल्याने भिंवडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नोटीस बजावली आहे.

सात दिवसांत सदरचे अतिक्रमण स्वतःहून दूर करावे, असे नोटीसमध्ये फर्मावले असून मुदतीनंतर कुठलीही पुर्व सुचना न देता शासकीय खर्चाने सदरचे अतिक्रमण दूर करुन अतिक्रमण भुमाफिया धारकांकडून खर्च वसूल करुन बिनशेती दंडाची रक्कम महसुल थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल असेही नोटीसीत नमुद केले आहे. तहसीलदारांनी बजावलेल्या या नोटीसमुळे पडघा येथील अतिक्रमण करणाऱ्या भुमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली असून नोटीसची मुदत संपल्यानंतर तहसीलदार शशिकांत गायकवाड काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -