घरमुंबईमुंबईत महिलांसाठी धावली पहिली 'बेस्ट'ची तेजस्विनी

मुंबईत महिलांसाठी धावली पहिली ‘बेस्ट’ची तेजस्विनी

Subscribe

मुंबईत महिलांसाठी पहिली 'बेस्ट'ची तेजस्विनी बस सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस या बसमार्गावरुन धावली आहे.

शहरातील महिला प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महिलांच्या या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी आता बेस्टच्या ताफ्यात तीन मिनी तेजस्विनी बसेस दाखल झाल्या आहेत. दरम्यान, बेस्ट उपक्रमाची महिला विशेष बस सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस (एनसीपीए) विशेष १ या बसमार्गावर गुरुवारी धावली आहे. सकाळी ८.०५ ते ११.३० आणि दुपारी ४.३० ते रात्री ८ यावेळेत दर सात मिनिटांनी ही बस चालविण्यात येणार आहे. अशा ३७ ‘तेजस्विनी’ बसगाड्या महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देणार आहेत. यापैकी सहा बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

३३ लाख प्रवाशांमध्ये ७ लाख महिला प्रवासी

गेल्या काही काळात महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. दररोज बसगाडीतून प्रवास करणाऱ्या ३३ लाख प्रवाशांमध्ये ७ लाख महिला प्रवासी आहेत. या प्रवाशांना तेजस्विनीचा दिलासा मिळणार आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात सहा तेजस्विनी बसगाड्या आल्या आहेत. तर दहा बसगाड्या प्रादेशिक वाहतूक कार्यालयात नोंदणीसाठी आहेत.

- Advertisement -

अशी आहे बसची व्यवस्था

या बसगाडीमध्ये ३५ आसन व्यवस्था असून त्या विनावातानुकूलित आहेत. तर जयपूरमध्ये तयार करण्यात आलेल्या अशा एका बसची किंमत २९.५ लाख रुपये आहे. तेजस्विनी योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाला केंद्राकडून ११ कोटींचे अनुदान मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत अशा १० बसगाड्या मार्च २०१८ पासून सुरु करण्यात आल्या आहेत. सकाळी ८.०५ ते ११.३० आणि दुपारी ४.३० ते रात्री ८ या वेळेत दर सात मिनिटांनी ही बस चालविण्यात येणार आहे.


हेही वाचा – पदांच्या वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -