घरदेश-विदेशधक्कादायक; डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून जाळून मारले

धक्कादायक; डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून जाळून मारले

Subscribe

या प्रकरणी संतप्त नेटकरी प्रियांकाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी करत आहेत.

बुधवारी रात्री बेपत्ता झालेल्या २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळलेला मृतदेह गुरुवारी सकाळी हैदराबादजवळ आढळला. त्यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. प्रियांका रेड्डी असं या तरुणीचं नावं असून ती प्राण्यांची डॉक्टर आहे. दवाखान्यातून घरी परतत असताना तिची दुचाकी शादनगर टोलक्याजवळ पंक्चर झाली होती. त्यावेळेस तिने बहिणाला कॉल लावून दुचाकी पंक्चर झाल्याचं सांगून तिला या ठिकाणी खूप भीती वाटतं आहे असं सांगितलं आणि प्रियांकाचा फोन बंद झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी तिचा शादनगर येथून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर अंडरब्रिजच्या खाली जळलेला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असून मात्र दुसरीकडे संतप्त नेटकरी #RIPPriyankaReddy असं हॅशटॅश ट्विट करून प्रियांकाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी करत आहेत.

नक्की काय घडलं?

रात्री ९:१५ च्या सुमारास प्रियांकाने तिच्या बहिणीशी शेवटाचा संपर्क केला. फोन कॉल ऑडिओवरून असं समजलं जात आहे की, एखाद्या अज्ञान व्यक्ती पंक्चर दुरुस्ती करण्यासाठी प्रियांकाला मदतीचा हात पुढे केला होता.

- Advertisement -

प्रियांकाच्या बहिणीचे असं म्हणणं आहे की, तिने प्रियांकाला टोल गेटवर जाऊन थांबण्याचा सल्ला दिला होता. कारण तिला सांगितलं होतं की, त्या भागात अज्ञात माणसे आणि ट्रक पार्क केलेले असतात.

जेव्हा प्रियांकाने बहिणीला कॉल केला होता तेव्हा तिला दुचाकी सोडून घरी निघून येण्यास सांगितलं होत. त्यानंतर प्रियांकाच्या बहिणीने पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन बंद होता, असं तिच्या बहिणीने सांगितलं.

- Advertisement -

प्रियांकावर अज्ञात व्यक्तीने रेप करून जाळल्याची माहिती समोर आली आहे. तिचा मृतदेह गंभीररित्या जळलेल्या अवस्थेत आढळला होता. मृतदेहाची ओळख तिच्या लॉकेटमुळे पटली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनानंतर तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, प्रियांकाला कचरा आणि रॉकेलच्या साहाय्याने जाळण्यात आलं असल्याची शंका पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून पोलिसांची १० पथकांना तैनात करण्यात आले आहे. प्रियांकाची दुचाकी अजूनही सापडलेली नाही आहे. ‘ज्याने हे कृत्य केलं आहे त्याला फाशी द्यावी’, अशी प्रियांकाच्या वडिल म्हणाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर नेटकरी देखील प्रियांकाला न्याय द्यावा म्हणून ट्विट करत आहे. तसंच #RIPPriyankaReddy हे हॅशटॅग ट्विटवर टॉप ट्रेंडमध्ये आहे.

प्रियांकाला न्याय मिळण्याबाबत नेटकऱ्यांची मागणी

अभिनेत्री पायल रोहतगी हिने देखील ट्विट केलं आहे. तिने ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, ‘मुस्लिम भागात हिंदू तरुणीला बलात्कार करून जाळून मारण्यात आले. देशातील माध्यमांनी ही बातमी दाखवावी आणि प्रियांकाला न्याय मिळवून द्यावा.’


हेही वाचा – अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे टिक-टॉक स्टारने दिली आत्महत्येची धमकी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -